शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
2
जम्मूमध्ये 'काश्मीर टाईम्स'च्या कार्यालयावर SIA चा मोठा छापा; AK-47 च्या गोळ्या आणि ग्रेनेडचा लिव्हर जप्त!
3
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
4
दिल्ली दंगल सूनियोजित कट होता; उमर खालिद-शरजील इमामच्या जामिनास पोलिसांचा विरोध
5
अ‍ॅसिड हल्ल्यातील 'ममता'चा अखेर मृत्यू; फेसबुकवर वेदना मांडणाऱ्या आईची दोन मुले झाली पोरकी
6
नेपाळमध्ये पुन्हा एकदा Gen-Z रस्त्यावर उतरले, मोठा गोंधळ सुरू; कर्फ्यू लागू
7
EVM मध्ये ३६ मतांची आघाडी, पण ३६० पोस्टल मते बाद झाली आणि पारडे फिरले, बिहारमधील अजब निकाल चर्चेत
8
Supreme Court: संसद न्यायालयीन निर्णयावर कुरघोडी करू शकत नाही; लवाद सुधारणा कायद्याच्या तरतुदी सुप्रीम कोर्टाकडून रद्द
9
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले; 350 टक्के शुल्काची धमकी देऊन भारत-पाक युद्ध थांबवल्याचा केला दावा
10
रॅपिडो ड्रायव्हर महिन्याला कमावतोय १ लाख रुपये, उत्पन्नाचे स्रोत वाचून बसेल धक्का
11
...याचं फळ म्हणून मला एकटं पाडलं का?; शहाजीबापू संतापले, मुख्यमंत्र्यांना विचारला थेट सवाल
12
"AI मुळे असे दिवस येतील की, ना नोकरी गरज असेल, ना पैशांची", एलन मस्क यांची मोठी भविष्यवाणी
13
"मी रुतबीला फिरायला नेतो..."; दीड वर्षांच्या लेकीला वडिलांनी फेकलं नदीत, हवा होता मुलगा
14
'धुरंधर' सिनेमात 'भाबीजी घर पर है' फेम सौम्या टंडनची एन्ट्री, म्हणाली - "माझ्या सीन्सकडे..."
15
होम लोन स्वस्त आणि पर्सनल लोन महाग का असतं? बँका का ठेवतात व्याजदरात फरक, जाणून घ्या
16
“दिल्ली स्फोटानंतर काश्मिरींकडे संशयाने पाहिले जातेय”; ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली खंत
17
मुंबईचा महापौर मराठी माणूस करणार का?; आशिष शेलारांचं उत्तर व्हायरल, "भाजपाचा महापौर हा..."
18
लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने टोळक्याकडून मारहाण, व्यथित झालेल्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन   
19
Mumbai: वर्षाभरात ६१ क्लास वन अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात; तरीही २०९ लाचखोरांचे निलंबन नाही!
20
दिल्ली स्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठ रडारवर; 200 हून अधिक शिक्षक-डॉक्टरांची चौकशी
Daily Top 2Weekly Top 5

तब्येतीची कारणे देत जबाबदारी टाळणा-या सैनिक, अधिका-यांवर कारवाई : बिपीन रावत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 17:29 IST

ढोंगी जवानांना सैन्यात स्थान नाही.....

ठळक मुद्देदक्षिण मुख्यालयातर्फे विकलांग सैनिकांचा सत्कार भारतीय सैन्याने हे वर्ष विकलांग सैनिकांना केले समर्पित कठीण आणि अडचणीच्या ठिकाणी काम करण्याचा आत्मविश्वास असल्यास सैन्यात तुमचे स्वागत

पुणे :‘‘भारतीय सेनेतील जे जवान सक्षम असून, विकलांग असल्याचं दाखवतात, तसेच ताण तणाव सहन करू शकत नाही असे कारण देत सीमेवर तैनात होण्यास नकार देतात अशा ढोंगी जवानांना सैन्यात स्थान नाही. मधुमेह, उच्च रक्तदाब अशी खोटी वैद्यकीय कारणे देऊन सीमेवर, कठीण, अडचणीच्या ठिकाणी जबाबदारी टाळणा-या अधिका-यांवर येत्या काळात लष्कराच्या मुख्यालयातून थेट कारवाई करण्यात येईल असा इशारा,’’ लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिला. भारतीय सैन्याने हे वर्ष विकलांग सैनिकांना समर्पित केले आहे. यानिमित्त लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे देशभरातील अशा सैनिकांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन पुण्यातील बाँम्बे इंजिनिअर ग्रुपच्या शहीद भगतसिंग सभागृहात आयोजन गुरूवारी केले होते. शत्रुशी दोन हात करताना अपंगत्व आलेल्या सैनिकांचा रावत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस.के.सैनी उपस्थित होते. तसेच लष्करातील अधिकारी आणि माजी सैनिक यावेळी उपस्थित होते.   रावत म्हणाले, लष्करात येणा-या जवानांना आणि अधिका-यांना कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. यामुळे  दबाव आणि तणाव सहन करण्याची क्षमता मिळत असते. मात्र, काही अधिकारी तसेच जवान स्वत: ला हा दबाव सहन करू शकत नाही. उच्च रक्तदान, या मधुमेह सारख्या आजारांची कारणे देत आघाडीवर जाण्यासाठी नकार दिला जातो. असे सैनिक हे मानसिक दृष्ट्या विकलांग असतात. अशा ढोंगी सैनिकांना चेतावणी देण्यात आहे की जर वेळेत सुधारला नाही तर लकवरच त्यांना लष्कराच्या मुख्यालयातून कारवाई करण्यात येईल.  दिव्यांग सैनिकांकडे  पाहून कळतं की त्यांच्यात अजूनही काम करण्याची प्रचंड इच्छाशक्ती आहे. या सैनिकांकडून कारणे देणा-या अधिका-यांनी शिकण्याची गरज आहे, असेही रावत यांनी सांगितले.  ........................भारतीय सैन्यदलाकडे केवळ नोकरी म्हणून पाहू नकाभारतीय सैन्यदलाकडे आजचे तरूण केवळ नोकरी म्हणून बघतात. हा दृष्टीकोन अतिशय चुकीचा आहे. अशांना मी चेतावणी देतो आहे. जर भारतीय लष्करात दाखल व्हायचे असल्यास शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मजबुत असायला हवे. मनोबल उंच हवे. प्रत्येक परिस्थितीला सामोर जाण्याची तयारी असायला हवी. जिथे रस्ता मिळत नाही त्या ठिकाणी स्वत: रस्ता निर्मिती करण्याची क्षमता असली पाहिजे. तरच ख-या अर्थाने तुम्ही सैनिक होऊ शकता. तुम्हाला नोक-या हव्या असतील तर रेल्वे किंवा इतर ठिकाणी  जा, स्वत: चा व्यवसाय सुरू करा पण भारतीय सैन्यात यायचे असेल तर मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत असणे आवश्यक आहे. कठीण आणि अडचणीच्या ठिकाणी काम करण्याचा आत्मविश्वास असल्यास सैन्यात तुमचे स्वागत आहे, असे जनरल बिपिन रावत तरूणांना उद्देशून म्हणाले. .................. विकलांग जवानांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी अधिकारी भारावले यावेळी विकलांग जवनांनी देशभक्ती गाण्यांवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या गाण्यांध्ये सैन्याचे जीवन त्यांनी अधोरेखित केले. याच बरोबर अतिशय कठीण असे टँक फॉरमेशन तसेच अवघड  नृत्य व्हिलचेअरवर विकलांग सैनिकांनी सादर केले. यामुळे उपस्थित सर्व अधिकारी भारावले होते. 

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय लष्करBipin Rawatबिपीन रावतSoldierसैनिक