नेरूळमधील इमारतीवर कारवाई
By Admin | Updated: May 21, 2016 02:59 IST2016-05-21T02:59:49+5:302016-05-21T02:59:49+5:30
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिडकोने अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे.
_ns.jpg)
नेरूळमधील इमारतीवर कारवाई
नवी मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिडकोने अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. सारसोळे व नेरूळ सेक्टर २० मधील दोन इमारती निष्कासित करण्यात आल्या असून २२० चौरस मीटरचा भूखंड अतिक्रमणमुक्त केला आहे.
नेरूळ सेक्टर २० मध्ये बालाजी मंदिर परिसरामध्ये सर्वे क्रमांक १५२ वर चार मजली इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. १२० चौरस मीटर जागेवर सिडकोची कोणतीही परवानगी न घेता हे बांधकाम केले होते. सिडको व मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गुरूवारी पोलीस बंदोबस्तामध्ये हे अतिक्रमण हटविले. याशिवाय सारसोळेमध्येही चार मजली इमारतीवर कारवाई केली आहे. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ४० पोलीस अधिकारी व सिडकोच्या सुरक्षा रक्षकांनाही तैनात केले होते.
सदर अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेमध्ये पी.बी. राजपूत, सुनील चिडचाले, गणेश पाटील, महापालिकेचे सहायक आयुक्त कैलाश गायकवाड व इतर अधिकारी उपस्थित होते. अतिक्रमण विरोधी मोहीम सुरूच राहणार असल्याचे सिडकोच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.