शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

आरती मिसाळ टोळीतील अंमली पदार्थ विक्री करणा-या ९ जणांवर मोक्का कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 10:40 PM

शहरात अंमली पदार्थांची विक्री करणा-या आरती मिसाळ टोळीतील ९ जणांवर पुणे पोलिसांनी मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीविरोधी कायदा)अंतर्गत कारवाई केली आहे.

पुणे : शहरात अंमली पदार्थांची विक्री करणा-या आरती मिसाळ टोळीतील ९ जणांवर पुणे पोलिसांनी मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीविरोधी कायदा)अंतर्गत कारवाई केली आहे. अंमली पदार्थ विक्री करणा-या टोळीवर मोक्काची ही शहरातील पहिलीच कारवाई आहे. खडक पोलिसांनी डिसेंबरमध्ये या टोळीकडून ६ लाख रुपयांचे हेरॉईन व चरस जप्त केले होते.आरती महादेव मिसाळ उर्फआरती विशाल सातपुते उर्फ आरती मुकेश चव्हाण (वय २७, रा. इनामके मळा, लोहियानगर), पुजा महादेव मिसाळ उर्फ पुजा ज्योतिबा तांबवे (वय ३२, रा. लोहियानगर), निलोफर हयात शेख (वय २७, रा. हरकारनगर), अजहर उर्फ चुहा हयात शेख (वय २४, रा़ हरकानगर), रॉकीसिंग जालिंदरसिंग कल्नयाणी (वय २३, रा़ रामटेकडी, हडपसर) गोपीनाथ नवनाथ मिसाळ (वय २२, रा़ लोहियानगर), हुसेन पापा शेख (वय २८, रा़ मुंबई), आयेशा उर्फ आशाबाई पाप शेख (रा़ मुंबई) व जुलैखाबी पापा शेख (रा. मुंबई) अशी मोक्कांतर्गत गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती मिसाळ ही अंमली पदार्थ विक्री करणा-या टोळीची मुख्य सूत्रधार आहे. तिच्यावर यापूर्वी खडक व पिंपरी पोलीस ठाण्यात ब्राऊन शुगर व दारू विक्रीचे ४ गुन्हे दाखल आहेत. पूजा मिसाळ हिच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात ब्राऊन शुगर विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल आहे. अजहर शेख याच्यावर खडक पोलिस ठाण्यात घरफोडी व मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला २०१४ मध्ये एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. तर निलोफर शेख या व्यवसायातून मिळालेले पैसे सावकारी व्यवसायात गुंतवत होती. तर रॉकीसिंग कल्याणी याच्यावरही खुनाचा प्रयत्न व दंगा मारामारी असे वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाईकरण्यात आली होती.डिसेंबर महिन्यात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून गोपीनाथ मिसाळ, हुसेन पापा शेख यांना अंमली पदा़र्थांसह अटक केली होती. आरती मिसाळ टोळीतील हे सर्वजण मुंबईतील आयशा उर्फ आशाबाई पापा शेख हिच्याकडून अंमली पदार्थ विकत घेत असल्याचे समोर आले होते. या टोळीमार्फत आरती मिसाळ शहरातील ओळखीच्या तरुणांना हेरॉईन, चरस, गांजा अशा प्रकारचे अंमली पदार्थ विक्री करत होती. या व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नातून ती प्लॉट, घर, वाहने खरेदी करत होती. तिच्याकडून अंमली पदार्थांसह एक मोटार, एक दुचाकी, रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा ६ लाखांचा माल पोलिसांनी जप्त केला होता. खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलिस निरीक्षक संभाजी शिर्के, उपनिरीक्षक संजय गायकवाड, अनंता व्यवहारे, कर्मचारी महेश बारवकर, महेश कांबळे, अनिकेत बाबर यांनी यांच्या पथकाने त्यांना पकडले. त्यानंतर पोलिसांनी आरती मिसाळ व तिच्या टोळीतील सदस्यांनी संघटीत टोळीमार्फत केलेल्या गंभीर गुन्ह्यांचे अवलोकन करून त्यांच्याविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव अपर पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावंकर यांच्याकडे प्र्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार त्यांनी या सर्वांविरुड मोक्कनुसार कारवाई करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी सहायक पोलिस आयुक्त किशोर नाईक पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Drugsअमली पदार्थ