बुलडाण्यात डायग्नोस्टिक सेंटरवर कारवाई
By Admin | Updated: June 9, 2016 18:14 IST2016-06-09T18:14:10+5:302016-06-09T18:14:10+5:30
पीसीपीएनडीटी कायद्यातंर्गत जिल्हयातील सिंदखेड राजा येथील डॉ. सदानंद बनसोड यांच्या साई डायग्नोस्टिक सेंटरवर 6 जून 2016 रोजी कारवाई करण्यात आली.

बुलडाण्यात डायग्नोस्टिक सेंटरवर कारवाई
>ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. ९ - पीसीपीएनडीटी कायद्यातंर्गत जिल्हयातील सिंदखेड राजा येथील डॉ. सदानंद बनसोड यांच्या साई डायग्नोस्टिक सेंटरवर 6 जून 2016 रोजी कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान साई डायग्नोस्टीक सेंटर सील करण्यात आले आहे. सदर कारवाई जिल्हा शल्य चिकीत्सक बुलडाणा यांचे मार्गदर्शनाखाली ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक व सिंदखेड राजा तहसिलदार यांनी एकत्रितरित्या केली आहे.
जिल्हा शल्य चिकीत्सक जालना यांनी दिलेल्या गोपनीय माहितीवरुन 6 जून 2016 रोजी बुलडाणा जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांचे उपस्थितीत तहसिलदार सिंदखेड राजा व वैद्यकीय अधिक्षक यांनी डॉ. सदानंद बनसोड यांचे साई डायग्नोस्टिक सेंटरवर पिसिपीएनडीटी कायदयांतर्गत लोकहितार्थ सिल करण्याची कार्यवाही केली.
कार्यवाही केल्यानंतर जिल्हा शल्य चिकीत्सक जालना यांनी तहसिलदार व वैद्यकीय अधिक्षक सिंदखेड राजा यांचे नावे दोन साक्षिदारांचे जाबाबासह पत्र दिले. साक्षिदारांचे जबाबात साई डायग्नोस्टिक सेंटर येथे साक्षिदारांची नातेवाईक असलेल्या गरोदर महिलेच्या पोटातील बाळाचे गर्भलिंग तपासणी करुन मुलगी असल्याचे डॉ.बनसोड यांनी सांगीतले होते. त्या जबाबाच्या अनुषंगाने डॉ. सदानंद बनसोड सिं.राजा यांचे सोनोग्राफी सेंटरवर पिसिपीएनडीटी कायदयांतर्गत सिल करण्याची कार्यवाही करण्यात आली, असे जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी सांगितले