कुंभमेळ्यात गोदावरी प्रदूषित करणाऱ्या भाविकांवर कारवाई

By Admin | Updated: December 20, 2014 02:50 IST2014-12-20T02:50:41+5:302014-12-20T02:50:41+5:30

कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांनी गोदावरी नदी प्रदूषित केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करा, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य शासनाला दिले़

Action on the devotees polluting Godavari in Kumbh Mela | कुंभमेळ्यात गोदावरी प्रदूषित करणाऱ्या भाविकांवर कारवाई

कुंभमेळ्यात गोदावरी प्रदूषित करणाऱ्या भाविकांवर कारवाई

मुंबई : कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांनी गोदावरी नदी प्रदूषित केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करा, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य शासनाला दिले़
न्या़ अभय ओक यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले़ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांनी गोदावरी प्रदूषित होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे़ नदी प्रदूषित करणाऱ्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी़ सिंहस्थासाठी लागणारा निधी फेब्रुवारी अखेरपर्यंत केंद्र सरकारने द्यावा अन्यथा राज्य शासनाने निधीची व्यवस्था करावी. नदीपात्राजवळ योग्य त्या उपाय योजना कराव्यात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे़ गोदावरीत सांडपाणी व औद्योगिक कंपन्यांचे प्रदूषित पाणी सोडले जाते़ त्यामुळे भाविकांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. नदीत सांडपाणी, कंपन्यांचे पाणी सोडण्यास मज्जाव करावा. गोदावरी स्वच्छ करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका राजेश मधुकर पंडित व इतरांनी अ‍ॅड़ पाठक यांच्यामार्फत दाखल केली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Action on the devotees polluting Godavari in Kumbh Mela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.