शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कार्ती चिदंबरम यांच्यावरील कारवाई राजकीय सूडबुद्धीने- अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 19:07 IST

पंजाब नॅशनल बँकेसह इतर काही बँकांना 12 हजार कोटींपेक्षा अधिक रकमेचा गंडा घालून देशाबाहेर पळून गेलेल्या नीरव मोदी व मेहुल चोकसी यांच्या घोटाळ्याच्या प्रकरणावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठीच कार्ती चिदंबरम यांना अटक केली असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे.

नांदेड- पंजाब नॅशनल बँकेसह इतर काही बँकांना 12 हजार कोटींपेक्षा अधिक रकमेचा गंडा घालून देशाबाहेर पळून गेलेल्या नीरव मोदी व मेहुल चोकसी यांच्या घोटाळ्याच्या प्रकरणावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठीच कार्ती चिदंबरम यांना अटक केली असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे.नांदेड येथे प्रसार माध्यमांशी बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम गेल्या चार वर्षांपासून सातत्याने शासनाच्या जनविरोधी धोरणाविरोधात बोलत आहेत. त्यांनी सरकारचे अपयश आणि घोटाळे जनतेसमोर मांडले म्हणून राजकीय सूडबुद्धीने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना टार्गेट करून त्रास देण्याचे काम केंद्र सरकारकडून सुरू आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्या या अशा सूडबुद्धीच्या कारवाईला घाबरत नसून या सरकारची गैरकृत्य व घोटाळे उघड करून जनतेसमोर सत्य मांडण्याचे आपले काम करत राहील, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. 

गेल्या काही तासांपूर्वीच माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना सीबीआयने अटक केली होती. सीबीआयने चेन्नई विमानतळावर अटकेची कारवाई केली. कार्ती चिदंबरम लंडनहून परतत असताना त्यांना ताब्यात घेत अटक करण्यात आली. आयएनएक्स मीडिया प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. आयएनएक्स मीडिया मनी लाँडरिंगप्रकरणी सुरू असलेल्या तपासात कार्ती चिदंबरम सहकार्य करत नसल्याचा सीबीआयचा आरोप आहे.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण