शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

अवैध धंद्यांवर धडक कारवाई

By admin | Updated: June 10, 2016 01:20 IST

मटका व जुगाराचे क्लब सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष करणारे पोलीस खाते अचानक जागे झाले आहेत

यवत : परिसरातील अनेक गावांमध्ये खुलेआम दारूविक्री, अनेकांचे संसार उध्वस्त करून कंगाल करणारा मटका व जुगाराचे क्लब सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष करणारे पोलीस खाते अचानक जागे झाले आहेत. त्यांच्यावर आता कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. वरिष्ठांच्या आदेशामुळे ही कारवाई सुरू असल्याची माहिती बेकायदा धंदे करणाऱ्यांच्या खबऱ्यांकडून मिळत आहे.मागील काही दिवसांत यवत व परिसरात रात्रीच्या वेळी मद्यप्राशन करून वाहने चालविणाऱ्यांविरोधात पोलिसांनी थेट कारवाई सुरू केल्याने मद्यपींनी चांगलाच धसका घेतला आहे. मात्र मद्यपींवर कारवाई करताना यवत पोलीस दुजाभाव करत असल्याची भावना संबंधित कारवाई केलेले नागरिक व्यक्त करत होते. पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर सुरू असलेले ढाबे व हॉटेलमधून बेकायदेशीपणे दारूविक्री सुरू असते. अशा हॉटेलच्या जवळपास थांबून दारू पिऊन जाणाऱ्या तळीरामांना पोलीस आपसूक पकडत होते. मात्र त्या ठिकाणी सुरू असणाऱ्या बेकायदा दारूविक्री करणाऱ्या हॉटेल चालकांवरच कारवाई का करीत नाहीत, असा प्रश्न संबंधित नागरिक व्यक्त करीत होते.मागील दोन दिवसांत यवत येथील गावठाण परिसर व बाजार मैदानात सुरू असणारा मोठा मटक्याचा अड्डा बंद आहे. तेथे आठवडे बाजार दिवस वगळता असणारी मटकाबहाद्दर मंडळींची गर्दी गायब झाली आहे. कारवाई होणार असल्याचा सुगावा लागल्याने संबधित मटकेबहाद्दर फरार झाले असल्याची चर्चा आता परिसरात रंगली आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड, पोलीस नाईक संदीप कदम, दीपक पालखे, महेश बनकर, शिपाई गणेश झरेकर, संपत खबाले, रणजीत निकम, शितोळे यांनी केली.खुलेआम विक्रीमुळे तक्रारी वाढल्या...अवैध दारूविक्री, मटके व जुगार अड्डे यांच्यावर कारवाई करताना स्थानिक पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस गुन्हे अन्वेषण शाखा यांच्याकडून वरिष्ठांचे आदेश आल्यानंतर कारवाई केली जाते. मात्र इतर वेळी सदर अवैध धंदे खुलेआमपणे सुरू असतात. स्थानिक पोलिसांचे जास्तीच्या कामामुळे तिकडे किती वेळ लक्ष देणार, अशी तक्रार कायम असते. तर अपुरे कर्मचारी असल्याचे अधिकारी वर्गाकडून कायम सांगितले जाते. ग्रामीण भागात कोट्यवधी रुपयांची माया जमा करणाऱ्या बेकायदेशीर प्रकारांवर वचक ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी विशेष पथक नेमावे, अशी मागणी होत आहे.