'थर्टी फर्स्ट'च्या रात्री 305 वाहनधारकांवर कारवाई
By Admin | Updated: January 1, 2017 17:41 IST2017-01-01T17:41:15+5:302017-01-01T17:41:15+5:30
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जिल्हाभरातील ३५५ जणांवर थर्टी फर्स्टच्या म्हणजेच ३१ डिसेंबरच्या रात्रीदरम्यान कारवाई करण्यात आली.

'थर्टी फर्स्ट'च्या रात्री 305 वाहनधारकांवर कारवाई
ऑनलाइऩ लोकमत
वाशिम, दि. 1 - वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जिल्हाभरातील ३५५ जणांवर थर्टी फर्स्टच्या म्हणजेच ३१ डिसेंबरच्या रात्रीदरम्यान कारवाई करण्यात आली.
३१ डिसेंबरच्या रात्रीदरम्यान, वाहनांवर तीन जण बसणे, विना क्रमांक वाहन चालविणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणा-यांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाईची मोहीम राबवली जाते. यावर्षी जिल्ह्यातील १३ पोलीस स्टेशनअंतर्गत त्या त्या पॉइंटवर नाकाबंदी करून वाहन तपासणी करण्यात आली.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ३०५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कारंजा येथे बायपासवर नाकाबंदी केली होती. कारंजा शहरात एकूण ४० वाहनधारकांकडून पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई झाली नाही.