रेल्वे प्रवाशांवर अॅसिड हल्ला
By Admin | Updated: April 4, 2017 05:43 IST2017-04-04T05:43:20+5:302017-04-04T05:43:20+5:30
दौंड ते नगर रेल्वे प्रवासादरम्यान पुणे-पाटणा एक्सप्रेसमधील सर्वसाधारण डब्यातील तिघा प्रवाशांना दोघा चोरट्यांनी मारहाण करत त्यांच्याकडील पैसे लुटले़

रेल्वे प्रवाशांवर अॅसिड हल्ला
अहमदगर : दौंड ते नगर रेल्वे प्रवासादरम्यान पुणे-पाटणा एक्सप्रेसमधील सर्वसाधारण डब्यातील तिघा प्रवाशांना दोघा चोरट्यांनी मारहाण करत त्यांच्याकडील पैसे लुटले़ प्रवाशांनी प्रतिकार केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर अॅसिडसारखा पदार्थ फेकून त्यांना जखमी केले़
शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली़ पुणे-पाटणा एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या विश्वनाथ राजधारी यादव (बिहार), प्रकाश गुंतीलाल गुनकर व बंडुकुमार कौल (मध्य प्रदेश) यांच्यावर शनिवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास दोघा चोरट्यांनी अचानक हल्ला केला़ त्यांच्याजवळील १,६०० रुपये काढून घेतले़ प्रवाशांनी चोरट्यांचा विरोध केला असता त्यांच्या चेहऱ्यावर अॅसिडसारखा पदार्थ फेकून त्यांना जखमी करण्यात आले़
रेल्वेने दौंड स्टेशन सोडल्यानंतर पुढील दहा मिनिटांत धावत्या रेल्वेत ही घटना घडली़ घटनेनंतर रेल्वेच्या मनमाड पोलीस ठाण्यात दोघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़ जखमींवर प्रथम मनमाड येथे तर नंतर नाशिक येथे उपचार करण्यात आले़ (प्रतिनिधी)