अच्युत गोडबोले यांना लाभसेटवार पुरस्कार
By Admin | Updated: January 13, 2015 05:10 IST2015-01-13T05:10:18+5:302015-01-13T05:10:18+5:30
अर्थतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांना यंदाचा डॉ. लाभसेटवार साहित्य सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख रुपये १ लाख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

अच्युत गोडबोले यांना लाभसेटवार पुरस्कार
मुंबई : अर्थतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांना यंदाचा डॉ. लाभसेटवार साहित्य सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख रुपये १ लाख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
शनिवार, ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता पुणे येथील मराठा चेंबर आॅफ कॉमर्सच्या सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडेल. या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते होणार आहे.
वृत्तनिवेदक अनंत व लता लाभसेटवार प्रन्यास, नागपूर आणि लाभसेटवार प्रतिष्ठान, अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराची निवड डॉ. सुनीलकुमार लवटे, सुनील मेहता यांच्या निवड समितीने केली आहे. पुरस्कार सोहळ्यात डॉ. अनंत लाभसेटवार लिखित ‘पराकाष्ठा’ या कादंबरीचे प्रकाशनही यावेळी करण्यात येईल.
(प्रतिनिधी)