शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना, राष्ट्रवादीतील फुटीनंतर काँग्रेसला अच्छे दिन; विरोधी पक्षनेतेपद मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 08:27 IST

राहुल गांधी यांना ठोठावलेल्या शिक्षेबद्दल केलेल्या काँग्रेसच्या मौन आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार सहभागी झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या

काँग्रेसलाच आले अच्छे दिनज्याचे संख्याबळ अधिक त्यांचाच विरोधी पक्षनेता होणार असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितल्याने राज्यात शिवसेना, राष्ट्रवादीतील फाटाफुटीत काँग्रेसलाच अच्छे दिन आल्याचे दिसू लागले आहे. काँग्रेसला पद मिळणार नक्की. पण ते द्यायचे कोणाला याचा तिढा सोडवणे मात्र कठीण होईल, इतके स्पर्धक रांगेत आहेत. अशा निवडीत सर्वांना सोबत घेऊन जाण्याबरोबरच अनेक पद्धतीचे समतोल सांभाळावे लागतात. त्यात श्रेष्ठींची कसोटी लागणार, हे नक्की.   

पवारांच्या नव्या पिढीची क्रेझराहुल गांधी यांना ठोठावलेल्या शिक्षेबद्दल केलेल्या काँग्रेसच्या मौन आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार सहभागी झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. दिल्लीतून शरद पवार यांना सांभाळून घेण्याचे संकेत राज्यातील नेत्यांना दिल्यानंतर पवारांनीही राज्यात काँग्रेससोबत जाण्याचे धोरण स्वीकारल्याचे यातून दिसून आले. पवार कुटुंबातील पुढच्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून रोहित यांच्याबद्दल काँग्रेसच्या अनेक नेत्यांत क्रेझ असल्याचे यावेळी दिसून आले. आंदोलन स्थळाजवळ त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यातून आणि नंतर टपरीवर चहा घेण्यातून त्याचा प्रयत्य आला. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीतील नाते आणखी घट्ट होईल याचा विश्वास काँग्रेसच्याच नेत्यांना वाटू लागला आहे.  

मेरा काम; मेरी पहचान...

मुंबईकरांकडून आमदारांच्या कामांचे मूल्यमापन केले जात असतानाच नुकतेच प्रजा फाउंडेशनने सादर केलेल्या अहवालात सर्वात वाईट कामगिरी केलेले आमदार म्हणून शिंदे गटाचे दिलीप लांडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यात त्यांचे विरोधक काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांच्या फॉलोअर्सने प्रजा फाउंडेशनच्या २०१७ च्या अहवालाचा दाखला देत नसीम खान यांची कामगिरी उजवी असल्याचे कॅम्पेन सोशल मीडियावर सुरू केले आहे. त्यामुळे अवघ्या काही मतांनी निवडून आलेले आमदार दिलीप लांडे यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा पाढा विधानसभेतील मतदारांनी वाचण्यास सुरुवात केली असून, या निमित्ताने पुन्हा एकदा खान आणि लांडे सोशल मीडियासह प्रत्यक्षात देखील आमने-सामने आले आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस