आरोपी आजीचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: August 18, 2014 04:51 IST2014-08-18T04:51:04+5:302014-08-18T04:51:04+5:30
सध्या मंगल बोरसे हिला उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले असून, तिच्यावर अंबरनाथ पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी आजीचा आत्महत्येचा प्रयत्न
बदलापूर : आपल्या गतिमंद नातीची हत्या करून अपहरणाचा बनाव रचणाऱ्या मंगल बोरसे (५४) या आजीने रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास कोठडीतच साडीचा पदर तोंडात कोंबून आत्महत्येचा प्रयत्न केला. महिला पोलिसांच्या ही बाब ध्यानात येताच त्यांनी तिची सुटका केली.
सध्या मंगल बोरसे हिला उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले असून, तिच्यावर अंबरनाथ पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगल बोरसे हिला बदलापूर पूर्व पोलिसांनी केतकी हिरे (वय अडीच वर्षे) या तिच्याच नातीच्या हत्येप्रकरणी शनिवारी अटक केली होती. बदलापूर येथे महिला
पोलीस कोठडी नसल्याने रात्री तिची
रवानगी अंबरनाथ पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. (वार्ताहर)