पोलिस स्थानकाच्या शौचालयात आरोपीची आत्महत्या

By Admin | Updated: May 2, 2016 11:56 IST2016-05-02T11:56:53+5:302016-05-02T11:56:53+5:30

मुलुंड पोलिस स्थानकाच्या शौचालयात एका आरोपीने रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास आत्महत्या केली. अमित राठोड असे या आरोपीचे नाव आहे.

The accused suicides in the police station's toilet | पोलिस स्थानकाच्या शौचालयात आरोपीची आत्महत्या

पोलिस स्थानकाच्या शौचालयात आरोपीची आत्महत्या

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २ - मुलुंड पोलिस स्थानकाच्या शौचालयात एका आरोपीने रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास आत्महत्या केली. अमित राठोड असे या आरोपीचे नाव आहे. २९ एप्रिलला त्याला घरफोडीच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली होती. 
 
रात्री अडीजच्या सुमारास शौचास गेलेल्या अमितने तिथे जाऊन अंगातील शर्ट काढला व गळफास घेऊन आत्महत्या केली. 
 
हा प्रकार डुयूटीवर तैनात असलेल्या पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी अमितला तातडीने मुलुंडच्या शासकीय अगरवाल रुग्णालयात दाखल केले तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. गुन्हे शाखेचे पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. 

Web Title: The accused suicides in the police station's toilet