कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर न्यायालयाच्या आवारात हल्ला

By Admin | Updated: April 1, 2017 15:01 IST2017-04-01T15:01:18+5:302017-04-01T15:01:18+5:30

कोपर्डी प्रकरणातील तीन आरोपींना न्यायालयात सुनावणीसाठी आणले असताना न्यायालयाच्या प्रवेशद्वारातच त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला

The accused in the Kopardi case attack in the court premises | कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर न्यायालयाच्या आवारात हल्ला

कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर न्यायालयाच्या आवारात हल्ला

>ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. १ - कोपर्डी प्रकरणातील तीन आरोपींना शनिवारी दुपारी येथील न्यायालयात सुनावणीसाठी आणले असताना न्यायालयाच्या प्रवेशद्वारातच त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली.
 
शनिवारी दुपारी कोपर्डी अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ, नितीन भैलुमे यांना पोलीस संरक्षणात न्यायालयात सुनावणीसाठी आणण्यात आले होत. न्यायालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत आरोपींना पोलीस घेऊन आले असता गर्दीचा फायदा घेत चार तरुणांनी कोयत्याने शिंदे, भवाळ, भैलुमे यांच्यावर हल्ला केला. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान राखत या हल्लेखोरांच्या तावडीतून शिंदे, भवाळ, भैलुमे यांची सुटका केली. यावेळी एक पोलीस जखमी झाला असून, या चारही हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेऊन भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात नेले. आरोपींकडून तीन कोयते व इतर शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. हल्लेखोरांमध्ये राजेंद्र पाटील जºहाड, बाबूराव वाळेकर, अमोल खुने, गणेश खुने यांचा समावेश आहे. ते शिवबा संघटनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: The accused in the Kopardi case attack in the court premises