चरस बाळगणारा आरोपी अटकेत

By Admin | Updated: October 8, 2016 01:00 IST2016-10-08T01:00:36+5:302016-10-08T01:00:36+5:30

निगडी ओटा स्कीम भागातील काळभोर गोठ्यासमोर एक व्यक्ती हातामध्ये काळी पिशवी घेऊन थांबला असल्याचे आढळून आला़

The accused held the accused | चरस बाळगणारा आरोपी अटकेत

चरस बाळगणारा आरोपी अटकेत


पिंपरी : अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अधिकारी पेट्रोलिंग करीत असताना निगडी ओटा स्कीम भागातील काळभोर गोठ्यासमोर एक व्यक्ती हातामध्ये काळी पिशवी घेऊन थांबला असल्याचे आढळून आला़ त्याची चौकशी केली असता पिशवीमध्ये चरस हा अमली पदार्थ आढळून आल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन अटक केली़ गुलाम सफ ीक अन्सारी (वय २१, रा़ भोसले वस्ती, चऱ्होली, मूळ खुदकला, ता़ स्वाद, जिल्हा रामपूर, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट चार आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने गुरुवारी आरोपीला पकडले. त्याच्या पिशवीमध्ये चरससारखा पदार्थ आढळून आला़ आरोपी अन्सारी याच्याकडून १ लाख ८० हजार किमतीचे ६०० ग्रॅम चरस जप्त केले़ गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने ही कारवाई केली. (प्रतिनिधी)

Web Title: The accused held the accused