शिर्डी येथून खून करून पळालेल्या आरोपीला मनमाड पोलिसांकडून अटक
By Admin | Updated: June 12, 2016 22:19 IST2016-06-12T22:19:19+5:302016-06-12T22:19:19+5:30
अवैध व्यवसायाच्या अड्ड्यावर टाकलेल्या धाडीमध्ये शिर्डी येथून खून करून पळालेल्या आरोपीला अटक करण्यात मनमाड पोलिसांना यश मिळाले

शिर्डी येथून खून करून पळालेल्या आरोपीला मनमाड पोलिसांकडून अटक
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 12- मनमाड शहर पोलिसांनी येथील बस स्थानकासमोरील अवैध व्यवसायाच्या अड्ड्यावर टाकलेल्या धाडीमध्ये शिर्डी येथून खून करून पळालेल्या आरोपीला अटक करण्यात मनमाड पोलिसांना यश मिळाले आहे.
मनमाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज येथील बस स्थानक परिसरात छापा मारून शिर्डीत राहणा-या अशोक मंगेश मोरे यास अटक केली. त्याच्या संशयास्पद हालचाली पोलिसांच्या नजरेतून सुटू शकल्या नाही. त्याच्याबाबत कसून चौकशी केली असता शिर्डी पोलीस ठाण्यात त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले. 5 मे रोजी शिर्डी येथे झालेल्या खुनाच्या घटनेत मोरे हा संशयित आरोपी आहे. या बाबत शिर्डी पोलिसांना पाचारण करून आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.