मुख्यमंत्री कार्यालयातील नियुक्ती नियमानुसारच

By Admin | Updated: November 1, 2015 01:25 IST2015-11-01T01:25:26+5:302015-11-01T01:25:26+5:30

मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालयासह विविध मंत्र्यांच्या आस्थापनेवर करण्यात आलेल्या अधिकारी पदावरील खासगी उमेदवारांच्या नियुक्त्या कायदेशीर व नियमानुसार असून, यापूर्वीच्या

According to the rules of appointment of Chief Minister's office | मुख्यमंत्री कार्यालयातील नियुक्ती नियमानुसारच

मुख्यमंत्री कार्यालयातील नियुक्ती नियमानुसारच

मुंबई : मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालयासह विविध मंत्र्यांच्या आस्थापनेवर करण्यात आलेल्या अधिकारी पदावरील खासगी उमेदवारांच्या नियुक्त्या कायदेशीर व नियमानुसार असून, यापूर्वीच्या काळातही अशा स्वरूपाच्या नेमणुका करण्यात आल्या असल्याचा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयातर्फे करण्यात आला. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी याबाबत आरोप केला होता. मुख्यमंत्री सचिवालयात विशेष कार्य अधिकारी, स्वीय सहायक, तसेच इतर मंत्र्यांच्या आस्थापनांवर याच पदांवर करण्यात आलेल्या नियुक्त्या घटनाबाह्य नाहीत. अशा प्रकारच्या नियुक्त्या यापूर्वीच्या काळातही राज्यात सत्तेवर असलेल्या विविध सरकारांतील मंत्र्यांनी केलेल्या आहेत. १९५६च्या कायद्यानुसार अशा खासगी उमेदवारांच्या नियुक्त्या करण्याची तरतूद नियमांमध्ये करण्यात आली आहे. मंत्रिमंडळातील सदस्यांना अशा नियुक्त्या करण्याचा पूर्ण अधिकार आहे. विशेषत: विशेष कार्य अधिकारी पदांवर खासगी व्यक्तींची नेमणूक करण्याची तरतूदसुद्धा पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. यापूर्वीच्या विविध सरकारांमध्ये सुद्धा खासगी क्षेत्रातून नियुक्त झालेले अनेक अधिकारी कार्यरत होते, असे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले
आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: According to the rules of appointment of Chief Minister's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.