शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना भोजन, निवासाची सोय; प्रत्येक जिल्ह्यात दोन वसतिगृहे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 13:27 IST

या निर्णयामुळे गावखेड्यातून जिल्हास्थळी शिक्षणासाठी येणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना निवास, भोजनासह इतर शैक्षणिक सुविधाही उपलब्ध होणार आहेत.

मुंबई :  राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी दोन अशी ७२ सरकारी वसतिगृहे अशासकीय संस्थांऐवजी सरकार स्वत: चालविणार असल्याचा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला आहे. जिल्हास्थळी वसतिगृहांसाठी जागा उपलब्ध न झाल्यास भाड्याने इमारती घेण्याची तयारीही दर्शविली आहे. या निर्णयामुळे गावखेड्यातून जिल्हास्थळी शिक्षणासाठी येणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना निवास, भोजनासह इतर शैक्षणिक सुविधाही उपलब्ध होणार आहेत.

वसतिगृहाच्या निर्णयाला उशीर का?शैक्षणिक वर्ष २०१९ मध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी निकषाप्रमाणे जमीन उपलब्ध झाल्यानंतर केंद्र सरकारला प्रस्ताव सादर केला जाणार होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर निधीची तरतूद करून काम सुरू केले जाणार होते. मंजुरी मिळाल्यापासून दोन वर्षांत या वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण करण्याची अट होती. मात्र, चार जिल्ह्यांत सरकारी जमीन उपलब्ध झाली. ३२ जिल्ह्यांमध्ये जागा उपलब्ध झाली नाही. जागाच उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून अशासकीय संस्थांना वसतिगृहांची जबाबदारी देण्याचा प्रयत्न झाला.

वसतिगृहातील सोयीनिवास, भोजन, स्टेशनरी व इतर शैक्षणिक सुविधा

कोणाला लाभ?इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या वसतिगृहांचा लाभ घेता येईल.

प्रवेशासाठी काय कराल?वसतिगृह सुरू झाल्यानंतर विभागामार्फत आवश्यक ती कार्यवाही आणि कागदपत्रांची यादीसंदर्भात सूचना विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांनी प्रादेशिक यंत्रणेकडे संपर्क करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रStudentविद्यार्थी