अजिंठा घाटात पुन्हा अपघात, ट्रक आणि कंटेनर 200 फुट खोल दरीत कोसळले

By Admin | Updated: May 7, 2017 15:04 IST2017-05-07T15:04:03+5:302017-05-07T15:04:03+5:30

अजिंठा घाटात मोसंबी घेवून जाणारा कंटेनर व बांगड्या घेवून जाणारा आयशर समोरा समोर धडकून घाटात 200 फुट खोल दरीत कोसळले.

Accidents, trucks and containers collapsed in the depth of 200 feet deep in Ajantha Ghat | अजिंठा घाटात पुन्हा अपघात, ट्रक आणि कंटेनर 200 फुट खोल दरीत कोसळले

अजिंठा घाटात पुन्हा अपघात, ट्रक आणि कंटेनर 200 फुट खोल दरीत कोसळले

> श्यामकुमार पुरे / ऑनलाइन लोकमत
अजिंठा (औरंगाबाद) दि. 7 - अजिंठा घाटात मोसंबी घेवून जाणारा कंटेनर व बांगड्या घेवून जाणारा आयशर समोरा समोर धडकून घाटात 200 फुट खोल दरीत कोसळले. हा अपघात शनिवारी मध्यरात्री झाला. यात जीवितहानी झाली नसली तरी 2 जण गंभीर  जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
 
दरम्यान शनिवारी पहाटे साडेपाच वाजता दोन ट्रकचा याच घाटात अपघात होऊन 8 तास वाहतूक ठप्प झाली होती, पूर्ण दिवस जळगाव- औरंगाबाद महामार्गावर हजारो वाहनधारकांचे  व प्रवाशांचे हाल झाले, ही घटना ताजी असतानाच परत मध्यरात्री दोन वाहने घाटातील दरीत कोसळले, जीवितहानी झाली नसली तरी अपघात का वाढत आहेत याचा पोलीस खात्याने अभ्यास करणे गरजेचे झाले आहे. घाटात चेक पोस्ट उभारल्यास अपघाताचे प्रमाण कमी होवू शकते.                      

Web Title: Accidents, trucks and containers collapsed in the depth of 200 feet deep in Ajantha Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.