एक्सप्रेस वे वर कामशेत बोगद्याजवळ अपघात, तीन ठार

By Admin | Updated: July 17, 2016 08:53 IST2016-07-17T08:16:21+5:302016-07-17T08:53:24+5:30

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर अपघाताची मालिका कायम असून, रविवारी पहाटे कामशेत बोगद्याजवळ एका गाडीला भीषण अपघात झाला.

Accidents near the Kamshet tunnel on Expressway, three killed | एक्सप्रेस वे वर कामशेत बोगद्याजवळ अपघात, तीन ठार

एक्सप्रेस वे वर कामशेत बोगद्याजवळ अपघात, तीन ठार

ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. १७ - मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर अपघाताची मालिका कायम असून, रविवारी पहाटे कामशेत बोगद्याजवळ आय २० गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात गाडीतील तीन जण ठार झाले. पहाटे चारच्या सुमारास मुंबईवरुन पुण्याकडे येणारी आय २० (MH 14 DF 5994) गाडी  रस्ता दुभाजकावर आदळल्यानंतर पलटी झाली. 
 
अपघातात ठार झालेले तिन्ही जण पुण्याचे असून, ते मुंबईला कामासाठी गेले होते. काम आटोपून पुण्याच्या दिशेने येत असताना गाडीचा एक्सप्रेस वे वरील कामशेत बोगद्याजवळ अपघात झाला. पहाटे चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघात नेमका कशामुळे झाला ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. 
 
मागच्या महिन्यातही मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर पनवेलजवळच्या शिवकर गावाजवळ भीषण अपघात झाला होता. एका खासगी बस दोन वाहनांना जोरदार धडक देऊन खड्डयात कोसळली होती. या अपघतात १७ जण ठार झाले होते. 

अपघातातील मृतांची नावे
अमित श्रीकांत सुळेभालीवर (वय 29 रा. यमुनानगर निगडी), संतोष सुरेश वृंदावत (वय 38 रा. कर्वेनगर पुणे) व शरद कृष्णराव पवार (वय 35 रा. वारजे माळ्वाडी पुणे) 
 

Web Title: Accidents near the Kamshet tunnel on Expressway, three killed