पिकनिकला जाणाऱ्या दुचाकीला अपघात

By Admin | Updated: June 27, 2016 02:33 IST2016-06-27T02:33:29+5:302016-06-27T02:33:29+5:30

माळशेज घाटात पिकनिकला जात असताना दुचाकीला कल्याण-मुरबाड महामार्गावर अपघात झाला.

Accidents on motorcycle picnic | पिकनिकला जाणाऱ्या दुचाकीला अपघात

पिकनिकला जाणाऱ्या दुचाकीला अपघात


टिटवाळा : माळशेज घाटात पिकनिकला जात असताना दुचाकीला कल्याण-मुरबाड महामार्गावर अपघात झाला. यात गणेश रामदास फाफाळ (२५) याचा जागीच मृत्यू झाला, तर हेमंत हांडे (२०) याचा पाय मोडला. जखमीला कल्याण येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. टिटवाळा पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
गणेश फाफाळ व हेमंत हांडे हे सकाळी घाटकोपर पश्चिम, भटवाडी येथून आपल्या एमएच ०३ - बीएक्स -११०० या क्रमांकाच्या दुचाकीने माळशेज घाटात पिकनिकला निघाले होते. सकाळी १० च्या सुमारास दुचाकी कल्याण-मुरबाड महामार्गावर मामनोली राष्ट्रीय सेवा संघाच्या जवळील वळणावर पोहोचताच समोरून येणाऱ्या गाडीला धडक देऊन खाली पडले.
या अपघातातून ते सुदैवाने बचावले; परंतु त्याच गाडीच्या मागून येणारा टेम्पो एमएच ३४ ए - ३७२६ च्या चाकाखाली येऊन गणेश फाफाळचा मृत्यू झाला. यात हेमंत हांडे जखमी झाला. महामार्गावरचे वाएते अपघात हा नागरिकांच्या चिंतेचा विषय झाला आहे. (वार्ताहर)

Web Title: Accidents on motorcycle picnic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.