शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
2
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
3
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
4
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
5
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
8
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
9
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
10
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
13
एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या
14
बाथरुममधील बादली खूपच खराब झालीय? एकही रुपया खर्च न करता 'अशी' दिसेल नव्यासारखी
15
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
16
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
17
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
18
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
19
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
20
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत

पुण्यातील पर्यटकांच्या कारला मालवणमध्ये अपघात, 2 जण गंभीर जखमी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2017 21:27 IST

दिवाळीच्या सुटीत पुणे येथून मालवणला पर्यटनासाठी येत असलेल्या पर्यटकांच्या कारला आनंदव्हाळ आजगाव बंगला बस थांब्याजवळ अपघात झाला. ही कार रस्त्याच्या डाव्या बाजूला दगडी गडग्यावर जोरदार आदळल्याने कारमधील दोघांना गंभीर दुखापत झाली. 

मालवण : दिवाळीच्या सुटीत पुणे येथून मालवणला पर्यटनासाठी येत असलेल्या पर्यटकांच्या कारला आनंदव्हाळ आजगाव बंगला बस थांब्याजवळ अपघात झाला. ही कार रस्त्याच्या डाव्या बाजूला दगडी गडग्यावर जोरदार आदळल्याने कारमधील दोघांना गंभीर दुखापत झाली.  यावेळी रात्रीची गस्त घालणा-या मालवण पोलिसांनी जखमींना तत्काळ मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर जखमींना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. हा अपघात शुक्रवारी मध्यरात्री घडला. पुणे येथून मालवणला पर्यटनासाठी सिमेज गोपाळप्रसाद पटेल (२७), नेहा सिमेज पटेल (२६, दोन्ही रा. पुणे) व नीरज अनिल कुहावहा (२४, रा. इंदोर-मध्यप्रदेश) हे तिघेजण आपल्या ताब्यातील कार (एमपी ०९, सीव्ही ५२२६) घेऊन  शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता निघाले.  शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास आनंदव्हाळ येथे कार आली असता रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या दगडी गडग्यावर भरधाव वेगात आदळली. या धडकेत कारने पलटी मारत रस्त्याच्या विरुद्ध दिशेने ती उभी राहिली. यावेळी कारचे दोन्ही एअर बलून उघडले होते. रात्रीची वेळ असल्याने अपघात घडल्यानंतर एकही वाहन रस्त्याने आले नाही. त्यानंतर काही वेळातच त्या मार्गावरून मालवण पोलीस रात्रीची गस्त घालीत होते. त्यावेळी त्यांना कारला अपघात झाल्याचे निदर्शनास आले. कारमधील तिन्ही पर्यटक कारमध्ये अडकून पडले होते. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल निलेश सोनावणे, रमेश तावडे व पावसकर यांनी जखमींना कारच्या बाहेर काढत पोलिसांच्याच गाडीने तत्काळ ग्रामीण रुग्णालयात  दाखल केले. यावेळी त्या मार्गावरून जाणाºया वाहन चालकांनी पोलिसांना सहकार्य केले. मालवण पोलिसांनी घटनास्थळावरून १०८ रुग्णवाहिका तसेच मालवण ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क न झाल्याने पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. यात सिमेज पटेल व नेहा पटेल यांच्या हाता-पायाला गंभीर दुखापत झाली. तर नीरज हा किरकोळ जखमी झाला. ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. शनिवारी सकाळी पोलिस सुनील वेंगुर्लेकर यांनी अपघाताचा पंचनामा केला.

टॅग्स :Accidentअपघात