गडचिरोली-नागपूर मार्गावर अपघात, ५ ठार
By Admin | Updated: December 13, 2015 12:01 IST2015-12-13T11:59:55+5:302015-12-13T12:01:40+5:30
गडचिरोली-नागपूर महामार्गावर देऊळगावजवळ रविवारी सकाळी ट्रक आणि मोटारीच्या झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली.

गडचिरोली-नागपूर मार्गावर अपघात, ५ ठार
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १३ - गडचिरोली-नागपूर महामार्गावर देऊळगावजवळ रविवारी सकाळी ट्रक आणि मोटारीच्या झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. अपघातात मरण पावलेले मनोज धरणे पोलिस दलात सहाय्यक निरीक्षक होते.
या अपघातात धरणे यांची पत्नी, दोन मुले आणि आई असे संपूर्ण कुटुंब मृत्यूमुखी पडले. रविवारी सकाळी धरणे आपल्या गाडीने गडचिरोलीच्या दिशेने येत असताना समोरुन येणा-या ट्रकने त्यांच्या मोटारीला धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, कुटुंबातील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला.