शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अपघाती मृत्यूंमध्ये ४३ टक्के घट; अपघातमुक्त महामार्ग योजनेचे यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 01:31 IST

सन २०१६ मध्ये एमएसआरडीसी, महामार्ग पोलीस, सेव्ह लाईफ फाऊंडेशन आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या वतीने अपघातमुक्त महामार्ग योजना (झिरो फटॅलिटी कॉरिडॉर प्रकल्प) राबविण्यात आली.

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे प्रवाशांसाठी २००२ मध्ये खुला करण्यात आला. हा देशातील पहिला एक्स्प्रेस वे आहे. येथे मोठ्या प्रमाणात अपघात घडत होते. त्यामुळे २०१६ मध्ये झिरो फटॅलिटी कॉरिडॉर प्रकल्प राबविण्यात आला. यामुळे गेल्या तीन वर्षांत अपघाती मृत्यूच्या प्रमाणात ४३ टक्क्यांनी घट झाली आहे. येथे २०१६ मध्ये १५१ जणांचा अपघाती मृत्यू झाला होता त्यामध्ये घट होऊन ही संख्या ८६ एवढी कमी झाली आहे.सन २०१६ मध्ये एमएसआरडीसी, महामार्ग पोलीस, सेव्ह लाईफ फाऊंडेशन आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या वतीने अपघातमुक्त महामार्ग योजना (झिरो फटॅलिटी कॉरिडॉर प्रकल्प) राबविण्यात आली. त्याअंतर्गत अपघातांचा अभ्यास करून अभियांत्रिकी समस्या सोडविण्यात आल्या. पार्क केलेल्या वाहनांना धडक बसून होणारे अपघात रोखण्यासाठी स्मार्ट पेट्रोलिंग मोहीम राबविली. अपघात घडला तर जखमींना तात्काळ वैद्यकीय मदत पुरविण्यासाठीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या.याबाबत बोलताना एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आर. एल. मोपलवार यांनी सांगितले की, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर होणारा प्रत्येक मृत्यू आमच्यासाठी गंभीर बाब आहे.अपघाती मृत्यू शून्यावर येत नाही तोपर्यंत आमच्या उपाययोजना सुरूच राहातील. तर, वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विनय कारगावकर म्हणाले की, सातत्याच्या गस्त आणि वाहतूक नियम न पाळणाऱ्यांविरोधात कारवाई, यामुळे अपघातात होणºया मृत्यूंच्या संख्येत घट होत आहे. यापुढेही वाहतूक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. प्रवाशांनी आम्हाला सहकार्य करावे तसेच जबाबदारीने वाहन चालवावे, असे आवाहनही त्यांनी केले.शून्य अपघाताचे ध्येयसेव्ह लाईफ फाऊंडेशनचे संस्थापक पीयूष तिवारी यांनी सांगितले की, रस्ता सुरक्षेसाठी एकत्ररित्या उपक्रम राबविणे हा भारतात होणारे अपघात रोखण्याचा एकमेव मार्ग आहे. अद्याप शून्य अपघाताचे ध्येय आम्हाला गाठता आलेले नाही पण एमएसआरडीसी, महामार्ग पोलीस आणि आम्ही एकत्रितपणे ते ध्येय नक्की गाठू असा विश्वास आहे.

टॅग्स :Accidentअपघात