मालाडमध्ये महिलेचा अपघाती मृत्यू

By Admin | Updated: April 28, 2016 02:33 IST2016-04-28T02:33:55+5:302016-04-28T02:33:55+5:30

मालाड येथे मंगळवारी झालेल्यामोटरसायकल आणि स्कूटीच्या धडकेत सुहासिनी वजीरकर(५५) या महिलेला प्राण गमवावे लागले.

Accidental death of a woman in Malad | मालाडमध्ये महिलेचा अपघाती मृत्यू

मालाडमध्ये महिलेचा अपघाती मृत्यू

मुंबई : मालाड येथे मंगळवारी झालेल्यामोटरसायकल आणि स्कूटीच्या धडकेत सुहासिनी वजीरकर(५५) या महिलेला प्राण गमवावे लागले. सुहासिनी सिद्धेश या आपल्या मुलासोबत मोटरसायकलवरून गोरेगावच्या दिशेने निघाल्या होत्या. कुरार येथे पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील ओमकार गेट परिसरात त्या आल्या असता; मागून भरधाव आलेल्या स्कूटीची त्यांना जोरदार धडक बसली.
या धडकेत सिद्धेशचे मोटरसायकलवरील नियंत्रण सुटले. त्याच्याकडून मोटरसायकल सावरण्याचा प्रयत्न केला जात असतानाच सुहासिनी रस्त्यावर कोसळल्या. डोक्याला दुखापत झाली. मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला.(प्रतिनिधी)

Web Title: Accidental death of a woman in Malad