जव्हारमध्ये शिक्षण विभागाचे केंद्र प्रमूख शंकर चौधरी यांचा अपघाती मृत्यू
By Admin | Updated: June 15, 2017 19:00 IST2017-06-15T19:00:59+5:302017-06-15T19:00:59+5:30
जव्हार विक्रमगड फाटा येथील जव्हार घाटातील वळणावर गुरुवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास बस व मोटारसायकल वाहन अपघातात शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख शंकर रघुनाथ चौधरी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

जव्हारमध्ये शिक्षण विभागाचे केंद्र प्रमूख शंकर चौधरी यांचा अपघाती मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
जव्हार (पालघर) दि. 15 - जव्हार विक्रमगड फाटा येथील जव्हार घाटातील वळणावर गुरुवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास बस व मोटारसायकल वाहन अपघातात शिक्षण विभागाचे केंद्र प्रमुख शंकर रघुनाथ चौधरी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
शाळेचा पहिला दिवस पाहण्यासाठी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा तपासून परतत असताना हा भीषण अपघात झाला. वाडा आगाराची जव्हार-वाडा-ठाणा ही बस ठाण्याला जात असताना वळणावर पंक्चर रिक्षा उभी होती. रस्ता अरुंद असल्यामुळे वळणावर बस एका बाजूला आल्याने जव्हारच्या दिशेने येणारे चौधरी यांची आणि बसची समोरासमोर धडक होऊन चौधरी यांच्या डोक्यावर जबर मार लागल्यामुळे त्यांची प्रकृती बिकट झाली. जव्हार कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बस चालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.