पर्यटकाचा अपघाती मृत्यू

By Admin | Updated: July 14, 2014 03:53 IST2014-07-14T03:53:35+5:302014-07-14T03:53:35+5:30

एका वृत्तपत्र कार्यालयात काम करणारे ४८ कर्मचारी बदलापूर येथील चंदेरी गडावर ट्रेकिंगसाठी गेले होते.

Accidental accidental death | पर्यटकाचा अपघाती मृत्यू

पर्यटकाचा अपघाती मृत्यू

बदलापूर : एका वृत्तपत्र कार्यालयात काम करणारे ४८ कर्मचारी बदलापूर येथील चंदेरी गडावर ट्रेकिंगसाठी गेले होते. त्यानंतर उतरताना दरड कोसळल्याने मालाड येथील अभिजित कदम (२४) याचा मृत्यू झाला. तर उर्वरित सर्व पर्यटकांना पोलिस, अग्निशमन दलाने सुखरूप खाली उतरविले.
बदलापूरच्या चंदेरी गडावर हे ट्रेकर्स शनिवारी सकाळी गेले होते. पावसाचा जोर वाढल्याने या सर्वांनी दुपारी २ वाजता गडावरून खाली उतरण्यास सुरुवात केली. पावसामुळे डोंगरावरून कोसळणारे काही दगड अभिजितच्या डोक्याला लागले. त्यात तो गंभीर जखमी झाला. चंदेरीच्या गुहेत असलेल्या पुजारी बाबांनी हळद लावून होणारा रक्तस्राव रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, रक्तस्राव न थांबल्याने सायंकाळी त्याचा मृत्यू झाला.
सहकाऱ्याचा मृत्यू झाल्याने सर्वच ट्रेकर्स उतरण्यास घाबरले. त्यामुळे सर्व गडावरच होते. हा प्रकार अग्निशमन विभागाला कळताच मदतकार्य सुरू करण्यात आले. त्यांच्या मदतीसाठी उल्हासनगरचे प्रांताधिकारी बी. जी. गावंडे, अंबरनाथचे तहसीलदार
अमित सानप, सहायक निरीक्षक धनंजय पोरे घटनास्थळी धावले. (प्रतिनिधी)

Web Title: Accidental accidental death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.