वाडा येथे अपघात; १ ठार, ५ गंभीर

By Admin | Updated: May 14, 2017 05:14 IST2017-05-14T05:14:58+5:302017-05-14T05:14:58+5:30

बोलेरो जीप व आयवा ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बिलोशी येथील प्रमोद नाईक या तरुणाचा मृत्यू झाला

Accident in the Wada; 1 killed, 5 critically | वाडा येथे अपघात; १ ठार, ५ गंभीर

वाडा येथे अपघात; १ ठार, ५ गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : तालुक्यातील खानिवली- गोर्हे-कंचाड मार्गावरील साईदेवळी येथे बोलेरो जीप व आयवा ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बिलोशी येथील प्रमोद नाईक या तरुणाचा मृत्यू झाला असून इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
वसुरी येथील ब्लू स्टार कंपनीची बोलेरो जीप कामगारांना वाडा येथून गोर्हेमार्गे खानिवलीच्या दिशेने घेऊन येत असताना हा अपघात झाला. जीपच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने जीप आयवाला समोरून धडकली. या अपघातात जीपमधील ५ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कैलास पातकर, जगदीश मांझे, विलास जाधव, सुभाष रणमुळे अशी जखमींची नावे आहेत.

Web Title: Accident in the Wada; 1 killed, 5 critically