देवदर्शनावरून परतताना अपघात; आठ जखमी
By Admin | Updated: October 23, 2016 22:48 IST2016-10-23T22:48:19+5:302016-10-23T22:48:19+5:30
बडेबाबा देवस्थानचे दर्शन घेऊन गावी परतत असताना चालक विजय खरात यांना चकवा बसल्यामुळे गाडीवरचा ताबा सुटल्याने अपघात झाला. यामध्ये माण तालुक्यातील मलवडी येथील आठजण जखमी

देवदर्शनावरून परतताना अपघात; आठ जखमी
>आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. 23 - बडेबाबा देवस्थानचे दर्शन घेऊन गावी परतत असताना चालक विजय खरात यांना चकवा बसल्यामुळे गाडीवरचा ताबा सुटल्याने अपघात झाला. यामध्ये माण तालुक्यातील मलवडी येथील आठजण जखमी झाले. त्यातील दोन महिला गंभीर आहेत. हा अपघात रविवारी खटाव तालुक्यातील मांडवे हद्दीत झाला. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मलवडी येथील खरात कुटुंबीय पाहुण्यांसोबत बडेबाबा देवस्थानला गेले होते. देवदर्शन करून माघारी येत असताना रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कारचे (एमएच १८ पी ३२५) चालक विजय खरात यांना चकवा बसल्यामुळे त्यांचा गाडीवरचा ताबा सुटला. त्यामुळे कार रस्त्याकडेला असणाºया ओघळीतून पन्नास मीटर उंच असणाºया भागावरून पुन्हा उलटत ओघळीत येऊन पलटी झाली. यामध्ये प्रवास करणाºया वंदना विजय खरात आणि रेखा रवींद्र शिलवंत यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. चार लहान मुले आणि दोन पुरुष हे किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघाताची रात्री उशिरापर्यंत वडूज पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)