पिंपरीत अपघात, ट्रकची ऑक्सीजन सिलेंडरच्या कंटेनरला धडक

By Admin | Updated: May 27, 2016 12:24 IST2016-05-27T12:24:56+5:302016-05-27T12:24:56+5:30

भक्ती शक्ती चौकात एका ट्रकने रुग्णालयात वापरण्यात येणाऱ्या ऑक्सीजन गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या कंटेनरला धडक दिली.

Accident in the pump, the oxygen of the truck hit the container | पिंपरीत अपघात, ट्रकची ऑक्सीजन सिलेंडरच्या कंटेनरला धडक

पिंपरीत अपघात, ट्रकची ऑक्सीजन सिलेंडरच्या कंटेनरला धडक

ऑनलाइन लोकमत 

पिम्परी, दि. २७ - भक्ती शक्ती चौकात एका ट्रकने रुग्णालयात वापरण्यात येणाऱ्या ऑक्सीजन गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या कंटेनरला धडक दिली. ही धडक एवढी प्रचंड होती की कंटेनर पलटी होऊन रस्त्यावर आडवा झाला. त्यानंतर ऑक्सीजन गॅस सिलेंडरने पेट घेतला. 
 
अग्निशनमचे तीन बंब घटनास्थळी रवाना झाले व पंधरा मिनिटांत आग आटोक्यात आणली. हा प्रकार शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडला. सुदैवाने यामध्ये कोणतिही जिवित हानी झाले नाही, मात्र कंटेनरचे नुकसान झाले असून चालक व क्लीनर दोघे जखमी झाले आहेत. 
 
घटनास्थळी निगडी पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले आहेत. या अपघातामुळे वाहतूक थांबवण्यात आलेली आहे.

Web Title: Accident in the pump, the oxygen of the truck hit the container