राज्य मंत्र्याच्या ताफ्यातील पोलीस वाहनाला अपघात

By Admin | Updated: September 8, 2016 14:10 IST2016-09-08T14:10:41+5:302016-09-08T14:10:41+5:30

ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या संरक्षण ताफ्यातील इगतपुरी पोलीस ठाण्याच्या वाहनाला बोरटेभे शिवार येथे भीषण अपघात झाला.

Accident of the police vehicle in the state cabinet | राज्य मंत्र्याच्या ताफ्यातील पोलीस वाहनाला अपघात

राज्य मंत्र्याच्या ताफ्यातील पोलीस वाहनाला अपघात

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
घोटी, दि. ८ - ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या संरक्षण ताफ्यातील इगतपुरी पोलीस ठाण्याच्या वाहनाला बोरटेभे शिवार येथे भीषण अपघात झाला. या अपघातात कर्तव्यावर असलेले दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले.या दोन्ही जखमींना उपचारार्थ नाशिकला हलविण्यात आले आहे.
 
भुसे हे आज सकाळी मुंबईहून नाशिककडे येत असताना इगतपुरी पोलीस ठाण्याच्या वाहनाचे टायर फुटल्याने हे वाहन रस्त्यालगत उभ्या असलेल्या एम.एच.04,इ. एल.9988 या टँकरवरर मागच्या बाजूने आदळले.
 
या अपघातात पोलीस वाहनावरील चालक डी.एस. गायकवाड यांच्यासह एस.एस.लोहरे हे गंभीर जखमी झाले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील,कर्मचारी नितीन भालेराव ,संदीप झालटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी पोलिसांना उपचारार्थ नाशिकला हलविले.याबाबत इगतपुरी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
 

Web Title: Accident of the police vehicle in the state cabinet