मुंबई - पुणे महामार्गावर अपघात, तिघांचा मृत्यू
By Admin | Updated: January 18, 2015 20:15 IST2015-01-18T20:15:07+5:302015-01-18T20:15:07+5:30
मुंबई - पुणे जुन्या महामार्गावर पिक अप व्हॅनने चौघांना चिरडल्याची दुर्दैवी घटना रविवारी संध्याकाळी घडली.

मुंबई - पुणे महामार्गावर अपघात, तिघांचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १८ - मुंबई - पुणे जुन्या महामार्गावर पिक अप व्हॅनने चौघांना चिरडल्याची दुर्दैवी घटना रविवारी संध्याकाळी घडली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये दोन लहान मुली व त्यांच्या आईचा समावेश आहे.
मुंबई - पुणे जुन्या महामार्गावर चौक गावाजवळ भरधाव वेगान असलेल्या पिक अप व्हॅनने चौघांना धडक दिली. या धडकेत तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाले आहे. जखमी हे मृत मुलींचे आजोबा असल्याचे समजते.