मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; १ ठार

By Admin | Updated: May 30, 2016 04:21 IST2016-05-30T04:21:03+5:302016-05-30T04:21:03+5:30

शनिवारी रात्री १२.०५च्या सुमारास पोलादपूरनजीक पार्टेकोंड फाट्याजवळ इको कार झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला.

Accident on Mumbai-Goa highway; 1 killed | मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; १ ठार

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; १ ठार


पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून शनिवारी रात्री १२.०५च्या सुमारास पोलादपूरनजीक पार्टेकोंड फाट्याजवळ इको कार झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला.
इको कारचालक गंगाराम कदम (६१, मूळ रा. मेढा सातारा, सध्या रा. घणसोली, नवी मुंबई) हा आपल्या ताब्यातील कार क्र. एमएम ११ एडब्लू ७५९ ही गाडी घेवून पोलादपूर बाजूकडून महाड दिशेने जात असता पोलादपूरनजीक पार्टेकोंड फाट्याजवळ त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटून कार भरधाव वेगात झाडावर आदळली. या अपघातात त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने गंगाराम कदम जागीच ठार झाले. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संभाजी हरगुडे, एएसआय मोकल, बाळासाहेब गोडगे, पिंगळे, प्रकाश जंगम व ट्रॅफिकचे आर. बी. पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास एएसआय मोकल हे करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Accident on Mumbai-Goa highway; 1 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.