मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात; 6 जखमी, वाहतूक वळवली
By Admin | Updated: January 18, 2017 20:50 IST2017-01-18T20:50:32+5:302017-01-18T20:50:32+5:30
मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगावजवळ सायंकाळी सहाच्या सुमारास कंटेनर आणि एसटी बसची जोरदार धडक होऊन अपघात

मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात; 6 जखमी, वाहतूक वळवली
>ऑनलाइन लोकमत
नाशिक,दि.18 - मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगावजवळ बुधवारी (दि़.18) सायंकाळी सहाच्या सुमारास कंटेनर आणि एसटी बसची जोरदार धडक होऊन अपघात झाला़. यामध्ये 6 जण जखमी झाले असून चार जणांवर अपोलो हॉस्पिटल तर एकास डॉ़. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी सचिन संजय वाघ (वय-१८, रा़जानोरी, ता़.दिंडोरी, जि़.नाशिक) आणि ऋतिक भाऊसाहेब निकम (वय-१६, रा़लक्ष्मीनगर, अमृतधाम, नाशिक) या दोघांवर लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत़. तर, श्रेया पगार (25, रा ओझर) हिच्यावर अपोलो रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले असून या कंटेनरने एका दुचाकीलाही धडक दिली़. यावेळी रस्त्यावरील वाहतूक बंद झाल्याने दुस-या मार्गाने वाहतूक वळविण्यात आली होती. (प्रतिनिधी)