शेतकऱ्यांना मिळणार अपघात विमा
By Admin | Updated: September 19, 2015 23:14 IST2015-09-19T23:14:48+5:302015-09-19T23:14:48+5:30
राज्यातील शेतकऱ्यांसाठी १ आॅक्टोबरपासून अपघात विमा योजना लागू केली जाणार आहे. विम्याचा हप्ता (प्रीमिअम) शासन भरेल. शेतकऱ्याचा अपघाती किंवा नैसर्गिक आपत्तीने मृत्यू
शेतकऱ्यांना मिळणार अपघात विमा
जळगाव : राज्यातील शेतकऱ्यांसाठी १ आॅक्टोबरपासून अपघात विमा योजना लागू केली जाणार आहे. विम्याचा हप्ता (प्रीमिअम) शासन भरेल. शेतकऱ्याचा अपघाती किंवा नैसर्गिक आपत्तीने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाई मिळेल, अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.
राज्यात कर्जाचे पुनर्गठण करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. जिल्हा बँकांकडून कर्ज घेतलेल्यांना या उपक्रमातून पुन्हा कर्ज दिले जाईल. ग्रामपंचायत हद्दीमधील तलाव हे पंचायतींना दिले जातील. ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढविण्यासाठी हा निर्णय झाला असून, मासेमारीसाठी तलावांचा उपयोग करता येईल, असेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना करपामुक्त केळी रोपे मिळावीत, यासाठी इंडो-इस्रायल केळी संशोधन केंद्र महिनाभरात जिल्ह्यात स्थापन केले जाईल. टिश्यू केळीच्या रोपांसाठी कर्जमर्यादेमध्ये वाढ करण्यासंबंधी राज्य शासन विचार करीत आहे. त्यासाठी ५० टक्के अनुदान आणि ५० टक्के कर्ज देता येईल का? याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. जिल्ह्यातील ४,५०० सहकारी संस्था बंद अवस्थेत आहेत. त्यांचे पुनरुज्जीवन होईल का? याबाबत उपनिबंधकांना आदेश दिले आहेत. त्या फक्त कागदावरच राहत असतील तर त्यांची नोंदणी रद्द करावी, अशाही सूचना दिल्या आहेत. सहकारी संस्थांना बळकटी देण्यासाठी ४०० कोटी आणण्याचा प्रयत्न असेल, असेही खडसे म्हणाले. (प्रतिनिधी)