डिंभे-आहुपे रस्त्यावर अपघात, ४८ प्रवासी जखमी

By Admin | Updated: July 13, 2016 14:58 IST2016-07-13T14:58:27+5:302016-07-13T14:58:27+5:30

मंचर-आहुपे व आसाणे- कुर्ला नेहरूनगर या दोन एसटी बसच्या समोरासमोर झालेल्या धडकेत ४८ प्रवासी जखमी झाले.

Accident on Dibbha-Aupape road, 48 passengers injured | डिंभे-आहुपे रस्त्यावर अपघात, ४८ प्रवासी जखमी

डिंभे-आहुपे रस्त्यावर अपघात, ४८ प्रवासी जखमी

ऑनलाइन लोकमत
घोडेगाव, दि. 13 - मंचर-आहुपे व आसाणे- कुर्ला नेहरूनगर या दोन एसटी बसच्या समोरासमोर झालेल्या धडकेत ४८ प्रवासी जखमी झाले. हा अपघात बुधवारी सकाळी आंबेगाव तालुक्यात डिंभे आहुपे रस्त्यावर फुलवडे गावच्या हद्दीत झाला. जखमींवर घोडेगाव ग्रामीण रुग्णालय व डिंभे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार सुरू आहेत.
अडिवरे गावचा बाजार असल्याने बहुतेक लोक आहुपे एसटीने (एमएच-२०/डी-७७१४) बाजारासाठी निघाले होते. तर आसाणे गाडीत (एमएच- १४/बीटी-१५२८) महाविद्यालयीन विद्यार्थी जास्त होते. फुलवडे गावच्या पुढे असलेले अवघड वळण घेवून आहुपे गाडी पुढे गेली असता समोरून आलेल्या आसाणे बसला धडक बसली. तसेच बीएसएनएलची केबल टाकण्यासाठी रस्ता बाजूने खोदल्याने अतिशय खराब व छोटा झाला आहे. त्यामुळे हा अपघात घडला. यात दोन्ही बसमधील प्रवाशांच्या तोंडाला जबर मार लागला. अनेकांचे दात पडले, तर काहींच्या जबडयाला जबर मार लागला. ४८ पैकी चार प्रवाशांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले. सर्व जखमींवर तातडीने उपचार करण्यात आले. एसटी महामंडळानेही जखमींना एक हजार रूपये रोख स्वरूपाची मदत केली.
अनर्थ टळला
अपघात घडला त्या ठिकाणी खालच्या बाजुला डिंभे धरणाचा जलसाठा आहे. या दोन्ही बस चालकांनी प्रसंगसावधान ठेवून गाडया जाग्यावर ठेवल्या. चुकून यातील एखादी गाडी खालच्या बाजुला गेली असती तर बस सकट सगळे प्रवाशाी पाण्यात गेले असते.

Web Title: Accident on Dibbha-Aupape road, 48 passengers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.