भाविकांच्या वाहनाला अपघात; चार ठार

By Admin | Updated: April 25, 2017 00:47 IST2017-04-25T00:47:28+5:302017-04-25T00:47:28+5:30

मोताळा (जि. बुलडाणा) : पंढरपूर येथे महापूजेसाठी जाणाऱ्या तालुक्यातील शेलगाव बाजार येथील भाविकांवर रविवारी पहाटे काळाने झडप घातली.

Accident of the devotees; Four killed | भाविकांच्या वाहनाला अपघात; चार ठार

भाविकांच्या वाहनाला अपघात; चार ठार

आठ जण गंभीर; बुलडाणा जिल्ह्यातील भजनी मंडळ

मोताळा (जि. बुलडाणा) : पंढरपूर येथे महापूजेसाठी जाणाऱ्या तालुक्यातील शेलगाव बाजार येथील भाविकांवर रविवारी पहाटे काळाने झडप घातली. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वानगाव फाट्यानजीक ३ वाजेच्या सुमारास जीप-ट्रकच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले असून, आठ जण गंभीर जखमी झाले.
शेलगाव बाजार येथील भाविक जीपने (क्रमांक एम. एच. २८ सी. २३५३) पंढरपूर येथे महापूजेसाठी जात होते. यावेळी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वानगाव फाट्यानजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक (क्रमांक ए.पी. २९ व्ही.२००१) व भाविकांच्या वाहनाची समोरासमोर धडक झाली. यामध्ये जीपचा अक्षरश: चुराडा झाला. शेलगाव बाजारचे ग्रामपंचायत सदस्य पदमाकर निनाजी खर्चे (३५), जया विलास चोपडे (४५), दिनेश निवृत्ती खर्चे (६०), तसेच अक्षदा संजय चौधरी (वय १६) हे चौघे जण जागीच ठार झाले. मंदा उद्धव खर्चे (४८), प्रकाश भास्कर खर्चे, रवींद्र वसंत खर्चे (३७), वैशाली रवींद्र खर्चे, रूपाली पद्माकर खर्चे (३१), रजनी दिनकर खर्चे (५५), धनराज बाबूराव पाटील (४५) तसेच जीपचालक अविनाश सोळंके हे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना बीड येथील टीएसएफ व लाइफ लाइन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Accident of the devotees; Four killed