नगर दौंड मार्गावर अपघात - 3 ठार, 6 गंभीर
By Admin | Updated: April 23, 2016 13:08 IST2016-04-23T13:08:13+5:302016-04-23T13:08:13+5:30
तालुक्यात नगर-दौंड राज्यमार्गावर ट्रक व पिकअपमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहे. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत

नगर दौंड मार्गावर अपघात - 3 ठार, 6 गंभीर
>ऑनलाइन लोकमत
श्रीगोंदा, दि. 23 - तालुक्यात नगर-दौंड राज्यमार्गावर ट्रक व पिकअपमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहे. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये पिकअप व्हॅनमधल्या 23 मेंढ्याही ठार झाल्या आहेत. विसापुर फाट्यावर पांढरेवाडी येथे आज शनिवारी सकाळी सहा वाजता हा अपघात झाला.
काष्टी येथे आठवडे बाजारासाठी मेंढ्या घेऊन जाणाऱ्या पिकअप व ट्रकची धडक झाली. यात विष्णू लाड, साहेबराव लाड (वाळकी), सागर पादिर (घोसपुरी) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. यात 23 शेळी मेंढ्याही ठार झाल्या असून 15 मेंढ्या गंभीर जखमी आहेत.