रुग्णवाहीकेला अपघात; एक जण ठार

By Admin | Updated: September 4, 2015 01:51 IST2015-09-04T01:51:48+5:302015-09-04T01:51:48+5:30

नांदुरा - खामगाव रस्त्यावर लांजुळ फाट्याजवळ अपघात.

Accident on Ambulance; One killed | रुग्णवाहीकेला अपघात; एक जण ठार

रुग्णवाहीकेला अपघात; एक जण ठार

नांदुरा (जि. बुलडाणा) : नांदुरा - खामगाव रस्त्यावर लांजुळ फाट्याजवळ रुग्णवाहिका व ट्रकमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात एक जण ठार झाला असून ७ जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना गुरूवारी रात्री ११.१५ च्यासुमारास घडली. तालुक्यातील दहीवडी येथील विनोद जगदेव इंगळे या तरुणाचा गुरुवारी अपघात झाला होता. येथील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान, डोक्याला मार असल्याने त्याला सीटी स्कॅनसाठी खामगाव येथे हलविण्यात आले. १0८ क्रमांकाच्या रुग्णवाहीकेतून विनोदला नेत असताना लांजुळ फाट्याजवळ ही रुग्णवाहीका आणि समोरुन येणार्‍या ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये विनोदसह डॉ तायडे व चालक मंगेश जयसिंग बंगरे रा. संग्रामपूर, सिद्धार्थ इंगळे, अजय वाकोडे, प्रभाकर इंगळे, वसंत इंगळे, ईश्‍वर ब्राम्हणे हे जखमी झाले. जखमींपैकी अंबर रतन धुरंधर रा. धोरपगाव तालुका खामगाव यांचा उपचारादरम्यान रात्री उशिरा मृत्यू झाला. दरम्यान, हे वृत्त येईपर्यंत पोलिस कारवाई सुरु होती. ठार झालेले अंबर धुरंधर हे जखमी विनोद इंगळेचे जावई असल्याचे माहिती आहे.

Web Title: Accident on Ambulance; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.