परिवर्तनासाठी राजकारणात प्रवेश - तारा सिंग
By Admin | Updated: October 11, 2014 06:10 IST2014-10-11T06:10:04+5:302014-10-11T06:10:04+5:30
परिवर्तन घडवायलाच हवे या उद्देशाने मी राजकारणात उडी घेतली. तेव्हापासून मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून समाजकार्य करतो आहे

परिवर्तनासाठी राजकारणात प्रवेश - तारा सिंग
राजकारणात उतरण्याचे कारण?
- १९८७ मध्ये पंजाबमधील शांतता रॅलीमध्ये राजीव गांधी यांंच्या समाजसेवी चळवळीने प्रेरित झालो. तेव्हापासून आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो ही भावना माझ्यात जागृत झाली. परिवर्तन घडवायलाच हवे या उद्देशाने मी राजकारणात उडी घेतली. तेव्हापासून मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून समाजकार्य करतो आहे.
कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचार करत आहात?
- मुलुंडमध्ये तीनशे खाटांचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, मुलुंडमध्ये सत्र न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, लघुवाद न्यायालय, जुन्या इमारतींचा २.५ ते ४ एफएसआयप्रमाणे पुनर्विकास करण्यासाठी आग्रहाची भूमिका, टोलमुक्त मुंबई, मुलुंड पूर्वेकडील हरिओमनगर येथे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सोडविण्यासाठी अत्याधुनिक गारबेज ट्रीटमेंट प्लांट तसेच मुलुंड-बोरीवली मोनो रेल कनेक्टिव्हिटी, ट्रॉमा सेंटरची तरतूद, पूर्व द्रुतगती महामार्गावरून मुलुंडमध्ये शिरण्यासाठी पर्यायी मार्गाची तरतूद मुलुंड पूर्व येथे क्रीडा संकुल, नव्या नाट्यगृहाची स्थापना, पेट्रोल पंपाची तरतूद, ज्येष्ठ नागरिकांसाठी गार्डन आणि विरंगुळा केंद्राची सुविधा असे अनेक मुद्दे पूर्ण करण्याचा ध्यास बाळगून मी प्रचार करत आहे.
आतापर्यंत के लेली कामे?
- गेल्या पंधरा वर्षांमध्ये मुलुंडचा ज्या वेगाने विकास होणे अपेक्षित होते तसे घडलेले नाही. मात्र विधान परिषद सदस्यपदी निवड होताच अवघ्या सहा वर्षांत मी हा विकास करून दाखवला. नाहूर रेल्वे पुलाच्या रुंदीकरणासाठी १०० कोटींचा निधी संमत करून घेतला. मुलुंडकरांसाठी नवीन स्मशानभूमी, तानसा पाइपलाइनलगतच्या ५00 झोपडीवासीयांंचे मुलुंडमध्येच पुनर्वसन, मुलुंडमधील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीसाठी ट्रक टर्मिनसची सुविधा, टोलमुक्त मुलुंड, त्याचप्रमाणे लादीकरण, शौचालये, वन्यजमिनीवरील झोपडीवासीयांंचे मुलुंडमध्ये म्हाडा-एमएमआरडीएच्या माध्यमातून प्रकल्प राबवून त्यांंचे पुनर्वसन मुलुंडमध्येच करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.
तुमचे प्लस पॉइंट कोणते?
- गेल्या १५ वर्षांपासून मी लोकांंची कामे करतो आहे. लोकांचा विश्वास हीच माझी खरी ओळख आहे. मुलुंडमधील नागरिकांसाठी मी एक राजकीय नेता नसून त्यांंच्या कुटुंबातलाच एक सदस्य आहे.