शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

"एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य"; अजित पवारांच्या एन्ट्रीनं शिवसेना आमदार नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 11:20 IST

एकनाथ शिंदे यांच्यावर भरवसा ठेऊन शिवसेना आमदार बाहेर पडले. कुणालाही नाराज करणार नाही असा शब्द शिंदेंनी दिला आहे असं शिरसाट यांनी सांगितले.

मुंबई – राष्ट्रवादी विरोधात राहणार नाही हे आम्हाला आधीपासून माहिती होते. २०१४ मध्येही त्यांनी प्रयत्न केले होते. एकनाथ शिंदे जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असेल. ज्यांनी उठाव केले त्याचे काही ना काही मिळवण्याचा उद्देश आहे. आमदारांना जो शब्द दिलाय तो पूर्ण होईल. एकनाथ शिंदेंनी सगळ्यांना आश्वासन दिलंय असं सांगत शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी अजित पवारांच्या सरकारमधील एन्ट्रीवर भाष्य केले आहे.

आमदार संजय शिरसाट म्हणाले की, आमच्याकडे १७२ संख्याबळ होते. परंतु राजकारणात एखादा विरोधी गट सोबत येत असेल तर त्यांना घेणे गरजेचे असते. तीच नीती भाजपाने अवलंबली. शरद पवारांचे खंदे समर्थक असलेले सोबत आलेत. राष्ट्रवादी येईल माहिती होते पण इतक्या लवकर येईल वाटलं नाही. अजित पवार गटाला सत्तेत सहभागी केल्यानं आमच्या लोकांना जी पदे मिळणार होती ती कमी झाली. त्यामुळे निश्चित नाराजी काही प्रमाणात आहे. यावर तोडगा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काढतील. नाराजी वाढणे हे चांगले नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच एकनाथ शिंदे यांच्यावर भरवसा ठेऊन शिवसेना आमदार बाहेर पडले. कुणालाही नाराज करणार नाही असा शब्द शिंदेंनी दिला आहे. पक्षाच्या नेत्यांजवळ आमची नाराजी सांगितली आहे. कुठल्याही स्थितीत  मंत्रिमंडळ विस्तार या २-४ दिवसांत व्हायला हवा. त्यात कुणाचा नंबर लागेल हा अधिकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा आहे. परंतु या बहुतांश लोकांचा समावेश होईल. आम्ही राष्ट्रवादीविरोधात आधीपासून होतो. आजही शरद पवारांविरोधात आहोत. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवून मोहरा बनवला. अडीच वर्ष मुख्यमंत्री असून राज्य शरद पवार चालवत होते. मविआ सरकारच्या काळात जो त्रास दिला त्यामुळे आम्ही उठाव केला. राष्ट्रवादीची साथ सोडा असं आम्ही उद्धव ठाकरेंना म्हटलं होते. आता आम्ही सरकार स्थापन केले त्यात ते आलेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेच चालेल असंही आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं.

दरम्यान, महाविकास आघाडी टिकणार नाही हे सत्य आहे. २०१४, २०१९ मध्येही राष्ट्रवादी विरोधात राहणार नाही याचा अंदाज आम्हाला आधीपासून होता. अद्याप आम्हाला कोणाचा फोन आला नाही. पुढे काय होईल हे पाहावे लागेल. जो काही निर्णय होईल तो एकनाथ शिंदे घेतील. ज्यांनी उठाव केलाय त्यांना न्याय मिळेल असंही आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारShiv SenaशिवसेनाSanjay Shirsatसंजय शिरसाट