शहरं
Join us  
Trending Stories
1
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
2
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
3
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
4
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
5
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
6
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
7
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
8
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
9
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
10
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
11
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
12
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
13
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
14
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
15
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
16
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
17
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
18
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
19
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
20
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप

"हिंमत असेल तर आमच्या मागण्या मान्य करा", आदित्य ठाकरेंचं थेट राज्य सरकारला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 16:42 IST

Aaditya Thackeray : हिंमत असेल तर आमच्या या मागण्या मान्य कराव्या, असे आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला दिले आहे. 

मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. सध्या विधानपरिषद निवडणुकीसाठीचे मतदान पार पडत आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारकडे एक मोठी मागणी केली आहे. मुंबईसह अनेक भागात झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प रखडले आहेत. त्याठिकाणी ठेकेदारांची नेमणूक करून सरकारने तो प्रश्न मार्गी लावावा. तसेच, अनेक ठिकाणी बहुमजली झोपडपट्ट्या आहेत, त्यांना देखील पात्रता यादीत सहभागी करून घ्यावे. हिंमत असेल तर आमच्या या मागण्या मान्य कराव्या, असे आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला दिले आहे. 

शुक्रवारी आदित्य ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी विधिमंडळ अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. तसेच, या खोके सरकारचे देखील शेवटचे अधिवेशन आहे, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. मुंबईसह अनेक भागात झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प रखडले आहेत. त्या ठिकाणी ठेकेदारांची नेमणूक करून सरकारने तो प्रश्न मार्गी लावावा. अनेक ठिकाणी बहुमजली झोपडपट्ट्या आहेत. अनेक ठिकाणी G+1, G+2 अशा झोपडपट्ट्या पाहायला मिळत आहेत. त्यांना देखील पात्रता यादीत सहभागी करून घ्यावे. हिंमत असेल तर आमच्या या मागण्या मान्य करा, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

या सरकारने गाजर अर्थसंकल्प मांडला असून या अर्थसंकल्पात मुंबईला काहीही मिळाले नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी तब्बल सहा हजार कोटींचा घोटाळा आम्ही जनतेसमोर आणला होता. तरी देखील सत्ताधारी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबईत बोलवून १८ जानेवारीला विविध प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले, मात्र त्यापैकी एकही रस्ता सुरू झाला नाही. त्यासंदर्भात अनिल परब यांनीही हक्कभंग आणला होता, असे आदित्य ठाकरे यांनी सांगत राज्यातील शिंदे सरकारवर निशाणा साधला.

याचबरोबर, महायुती सरकार कोस्टल रोड देखील पूर्णपणे सुरू करू शकले नाही. जे काम सुरू आहे त्यांचे खोटे भूमिपूजन करायला पंतप्रधानांना  मुंबईत आणले जात आहे. हे सत्ताधारी पक्ष मोदी यांचे नाव बदनाम करत आहेत, त्यामुळे तुम्ही याकडे जरा लक्ष द्या आणि योग्य ती कारवाई करा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना केले आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी आज विधान भवनाला वंदन केलं आहे. विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी जाता जाता पायरीला स्पर्श करत विधान भवनाला वंदन केले.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेvidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवनMaharashtraमहाराष्ट्रShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे