शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

एसीबीची धुरा सतीश माथूर यांच्याकडे?

By admin | Updated: February 22, 2016 01:02 IST

गेल्या महिन्यात मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी दत्ता पडसलगीकर आले आणि त्याविषयीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. त्यामुळे आता चर्चा रंगलीये ती म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक

- जमीर काझी,  मुंबईगेल्या महिन्यात मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी दत्ता पडसलगीकर आले आणि त्याविषयीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. त्यामुळे आता चर्चा रंगलीये ती म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीचे नवीन महासंचालक कोण होणार? याची. येत्या महिनाअखेरीस विजय कांबळे सेवानिवृत्त होत आहेत. कांबळे यांच्या जागी पोलीस गृहनिर्माण विभागाचे कार्यकारी संचालक सतीश माथुर व गृहरक्षक दलाचे महासमादेशक राकेश मारिया यांच्यात स्पर्धा आहे. तथापि, माथूर यांचे पारडे जड असल्याचे गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.नव्या बदलांमध्ये पुण्याचे आयुक्त के. के. पाठक यांनाही महासंचालकपदी बढती दिली जाणार आहे. पाठक यांच्याकडे ‘फॉरेन्सिक’चा पदभार सोपविला जाईल. मीरा बोरवणकर यांची ‘हाउसिंग’ला बदली केली जाण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली.

पाठक यांना महिन्याचा कालावधीविजय कांबळे २९ फेबु्रवारीला निवृत्त होत असल्याने डीजी या रिक्त झालेल्या पदावर पुण्याचे आयुक्त के. के. पाठक यांचे प्रमोशन निश्चित आहे. ते १९८४च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असून, ३१ मार्चला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांना जेमतेम एक महिन्याचा अवधी मिळणार आहे. गेल्या एप्रिलपासून पाठक हे पुण्याच्या आयुक्तपदी कार्यरत आहेत.कुलकर्णी, रंजन यांची चर्चापाठक यांना बढती मिळाल्यानंतर पुण्याच्या आयुक्तपदासाठी मुंबईचे गुन्हा अन्वेषण शाखेचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी व नवी मुंबईचे आयुक्त प्रभात रंजन यांच्या नावाची गृह विभागात चर्चा आहे. कुलकर्णी यांना ३१ डिसेंबरला अपर महासंचालकपदावर पदोन्नती मिळूनही अद्याप त्यांच्याकडे सहआयुक्ताचा पदभार आहे. त्यामुळे त्यांची पाठक यांच्या जागी किंवा रंजन यांची पुण्याला नियुक्ती झाल्यास कुलकर्णी यांच्याकडे नवी मुंबईची धुरा दिली जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले. मारियांच्या तपासावर शिक्कामोर्तबशीना बोरा हत्येप्रकरणी पीटर मुखर्जीकडे सातत्याने कसून चौकशी केल्यानेच मारिया यांना आयुक्तपदावरून हलविण्यात आले होते. मात्र सीबीआयने केलेल्या चौकशीत पीटर दोषी असल्याचे स्पष्ट झाल्याने मारिया यांचा तपास योग्य दिशेने होता, हे न्यायालयात दाखल झालेल्या आरोपपत्रातून स्पष्ट झाले आहे.