एसी डबल डेकरला रेल्वेचाच अडथळा
By Admin | Updated: July 30, 2014 02:22 IST2014-07-30T02:22:23+5:302014-07-30T02:22:23+5:30
कोकण रेल्वेवर एसी डबल डेकर ट्रेन सुरू करण्यात रेल्वे प्रशासनच अडथळे निर्माण करीत असल्याचे समोर येत आहे.

एसी डबल डेकरला रेल्वेचाच अडथळा
मुंबई : कोकण रेल्वेवर एसी डबल डेकर ट्रेन सुरू करण्यात रेल्वे प्रशासनच अडथळे निर्माण करीत असल्याचे समोर येत आहे. मध्य रेल्वेबरोबरच, कोकण रेल्वेकडूनही ही ट्रेन चालवण्याबाबत उदासीनता दिसून येते. याबाबत मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी प्रवासी सुरक्षेच्या नावाखाली विचारलेल्या प्रश्नांना रेल्वे अधिका:यांना उत्तरे देणो कठीण जात असल्याचे सांगितले जाते.
कोकणवासीयांसाठी एकही पूर्णपणो एसी ट्रेन नाही. त्यामुळे एसी डबल डेकर ट्रेन चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला. या ट्रेनच्या चाचण्या रेल्वेच्या आरडीएसओकडून घेण्यात आल्यानंतर कोकण मार्गावर आणि मध्य रेल्वेवर धावण्यास अडथळा नसल्याचे अहवालात सांगण्यात आले. त्यानंतर हा अहवाल कोकण व मध्य रेल्वेला आरडीएसओने सादर केल्यानंतर मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांना हा अहवाल देणो गरजेचे होते. मात्र तो अद्याप गेलेला नाही. उलट कोकण रेल्वेकडून आलेल्या अहवालावर सुरक्षा आयुक्तांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याची प्रत एक आठवडय़ापूर्वी कोकण रेल्वेला पाठवली आहे. तर मध्य रेल्वेकडून आरडीएसओचा अहवाल आलेला नसतानाही सुरक्षा आयुक्तांनी कोकण रेल्वेला पाठविलेली एक प्रत मध्य रेल्वेलाही पाठवलेली आहे. परंतु आठ दिवस उलटूनही या पत्रवर कोकण आणि मध्य रेल्वेकडून कुठल्याही प्रकारचे उत्तर देण्यात आलेले नाही. या पत्रचे उत्तर देण्यास रेल्वेचे प्रशासनच उदासीन असल्याचे यातून दिसून आले आहे. त्यातच सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी कोकण आणि मध्य रेल्वेला पाठवलेल्या पत्रत भलतेच आणि अजब प्रश्न विचारण्यात आल्याचे सांगितले जाते. प्रवाशांच्या सुरक्षाविषयक प्रश्न उपस्थित करण्याऐवजी वेळ, देखभाल आणि दुरुस्तीसंबंधी अनेक प्रश्न त्यामध्ये आहेत. (प्रतिनिधी)
च्सुरक्षा आयुक्तांकडून काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्याची उत्तरे लवकरच देण्यात येतील. ही ट्रेन लवकरात लवकर चालवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
च्आमच्याकडून अहवाल सुरक्षा आयुक्तांना गेलेला आहे. त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. मात्र विचारलेले प्रश्न कोकण आणि मध्य रेल्वेशी संबंधित असल्याने दोघेही एकत्रित निर्णय घेऊ, असे कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे म्हणाल्या.
च्आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांना एक आठवडा उलटूनही उत्तर मिळालेले नाही. कोकण आणि मध्य रेल्वेकडून त्याची उत्तरे देण्यास एवढा उशीर का लागत आहे, हे समजत नाही. या ट्रेनसाठी ताशी 1क्क्च्या वेगाची परवानगीही त्यांनी मागितली असल्याचे मध्य रेल्वेचे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी म्हणाले.
रेल्वेच्या नियमानुसार निदान सहा ते सात तास एक्स्प्रेस-मेल ट्रेनची देखभाल करण्यास लागतात. मात्र एलटीटी ते मडगाव धावणारी एसी डबल डेकर ट्रेन एकच असल्याने आणि ती 11 तास धावणार असल्याने देखभाल कशी शक्य होईल? हा आणि असे अनेक प्रश्न सुरक्षा आयुक्तांनी विचारले आहेत.