विद्यार्थिनींशी गैरवर्तन करणारा शिक्षक गजाआड
By Admin | Updated: February 21, 2017 20:38 IST2017-02-21T20:38:04+5:302017-02-21T20:38:04+5:30
नेवासा तालुक्यातील हिंगोणी येथील जिल्हा प्राथमिक शाळेतील विद्यार्थीनींशी अश्लिल चाळे करणाऱ्या शिक्षकाविरोधाशनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल

विद्यार्थिनींशी गैरवर्तन करणारा शिक्षक गजाआड
ऑनलाइन लोकमत
नेवासाफाटा, दि. 21 : नेवासा तालुक्यातील हिंगोणी येथील जिल्हा प्राथमिक शाळेतील विद्यार्थीनींशी अश्लिल चाळे करणाऱ्या शिक्षकाविरोधाशनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याला मंगळवारी पोलीसांनी ताब्यात घेतले़ हिंगोणी येथील प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थीनींशी वर्गशिक्षक फक्कडराव नारायण शिंदे गेल्या अनेक दिवसांपासून गैरवर्तन करत होता़ शाळेतील एका मुलीने ही बाब पालकांना सांगितली़ सदर मुलीच्या पित्याने शनिशिंगणापूर ठाण्यात शिंदे विरोधात फिर्यादी दाखल केली
पोलीसांनी शिंदेविरोधात कलम ३५४(अ),५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला मंगळवारी अटक केली़ शिंदे हा वर्गातील सर्वच विद्यार्थीनीश गैरवर्तन करत असल्याचे समोर आले आहे़ अनेक विद्यार्थिनींनी या शिक्षकाच्या गैरकृत्याचे घरच्यांसमोर कथन केले़ शिंदे विरोधात फिर्याद दाखल होताच पोलीस निरिक्षक वैभव पटेकर यांनी त्याला मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अटक केली़