बालिकेवर अतिप्रसंग करणाऱ्यास सक्तमजुरी
By Admin | Updated: June 13, 2017 01:02 IST2017-06-13T01:02:37+5:302017-06-13T01:02:37+5:30
बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी भरत छगन एडके (रा़ देवळाली ताक़ळंब) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

बालिकेवर अतिप्रसंग करणाऱ्यास सक्तमजुरी
- लोकमत न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी भरत छगन एडके (रा़ देवळाली ताक़ळंब) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
कळंब तालुक्यातील देवळाली येथील एक दाम्पत्य शेताकडे गेले असताना त्यांच्या ८ वर्र्षांची मुलीला घराकडे बोलावून भरतने अत्याचार केल्याची फिर्याद पीडित मुलीच्या नातेवाईकांनी ११ मार्च २०१७ रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात दिली होती़ याप्रकरणी एका महिन्यांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले, तर अवघ्या दहा दिवसांत सुनावणी पूर्ण करण्यात आली.
पुरावे, फिर्यादी व पीडित मुलीचा जबाब व प्रत्यक्षदर्शी महिलेची साक्ष व अभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ए़ए़आऱऔटी यांनी भरत छगन एडके याला पोस्कोच्या कलम ६ नुसार १० वर्षे सक्तमजुरी आणि ३० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ वर्षे सक्तमजुरी, तसेच त्याच कायद्याचे कलम ४ नुसार ७ वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ दंडाची ५० हजारांची रक्कम पीडित व तिच्या कुटुंबास देण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याचे अॅड़ सचिन सूर्यवंशी यांनी सांगितले़