शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

सोशल मीडियाचा दुरुपयोग गुन्हाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 6:13 AM

सोशल मीडियाच्या आभासी विश्वात लिहिणारे, इतरांबद्दल अपमानस्पद पोस्ट लिहिण्यास मुक्त असल्याचे समजत असले

डॉ. खुशालचंद बाहेती मुंबई : सोशल मीडियाच्या आभासी विश्वात लिहिणारे, इतरांबद्दल अपमानस्पद पोस्ट लिहिण्यास मुक्त असल्याचे समजत असले, तरी हा दुरुपयोग आहे, असे बजावून केरळ उच्च न्यायालयाने फेसबुकवर महिलेविषयी अश्लील मजकूर लिहिणाऱ्या एका राजकीय पक्षाच्या राज्य युवा महासचिवाचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला.या प्रकरणातील महिला ही एक सामाजिक कार्यकर्ती व एका खासदाराची पत्नी आहे. तिने नुकतेच एक पुस्तक प्रकाशित केले आहे. तिने दिलेल्या तक्रारीप्रमाणे फेसबुकवर आरोपीने तिच्याबद्दल अश्लील लिखाण केले आहे. त्याने फेसबुकवर या महिलेचा तिच्या पतीसह फोटोही टाकला असून, यावरुन लैंगिक छळाची पोस्ट तिच्या छळासाठीच टाकल्याचे स्पष्ट होते. या महिलेच्या तक्रारीवरून विनयभंग ३५४ अ (३) भा.दं.वि. व ६७ अ माहिती तंत्रज्ञान कायद्यासह केरळ पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात सत्र न्यायालयाने यापूर्वीच जामीन नाकारला आहे.केरळ उच्च न्यायालयाने फेसबुकचा स्क्रीनशॉट पाहून आरोपीचे म्हणणे अमान्य केले. एका राजकीय पक्षाच्या राज्य महासचिवाने जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे, असे नमूद करून त्यांचे लिखाण प्रथमदर्शनी लैंगिक छळाचा गुन्हा आहे, असे मत व्यक्त केले. आरोपीला महिलेविषयी अपमानस्पद लिहिण्याचे कोणतेही कारण नव्हते. महिलेच्या लैंगिक छळासाठी आरोपीने अंगीकारलेली पद्धत ही सायबर सेक्सिझम किंवा सायबर दुर्व्यवहार प्रकारात मोडते व हा लैंगिक छळ आहे, असे नमूद करून जामीन अर्ज फेटाळला.