शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...
2
“कुठूनही पैसे आणा, पण शेतकरी कर्जमुक्ती करा, सातबारा कोरा करा”; मनसेचा बच्चू कडूंना पाठिंबा
3
“ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
Video: 'महाराष्ट्रातून कोण आलंय? इकडे ये...', नाशिकच्या तरुणासोबत हरयाणात काय घडले? पाहा...
5
Video - हृदयद्रावक! लेक्चरमध्ये विपरित घडलं, शिक्षकाला मृत्यूने गाठलं अन्...; 'मृत्यू' कॅमेऱ्यात कैद
6
रुग्णालयात सुरू होती शस्त्रक्रिया तेवढ्यात फॉल्स सिलिंग तुटून ऑपरेशन थिएटरमध्ये पडला कुत्रा, त्यानंतर...  
7
नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाईंना धक्का; उपसभापती म्हणाल्या,'माझ्यावर का खेकसताय?'
8
TCS ची दिवाळी! अपेक्षांना मागे टाकत कमावला १२,७६० कोटींचा नफा, शेअरधारकांना किती लाभांश मिळणार?
9
महाकाय किंग कोब्रा सापाची महिला वन अधिकाऱ्याने केली सुटका, सचिन तेंडुलकरने केलं कौतुक
10
98%ने घसरून थेट 96 पैशांवर आला होता हा ज्वेलरी शेअर, आता 1800% ने वधारला; करतोय मालामाल!
11
"नितीश कुमार नाम सुनके फ्लावर समझे क्या; फ्लावर नहीं फायर है..." दोन्ही सलामीवीरांना धाडलं तंबूत
12
‘दिवसातून ३ तासच वीज येते, काही तरी करा’, उत्तरदाखल ऊर्जामंत्री जय श्रीराम म्हणाले आणि निघून गेले   
13
सावधान! स्क्रीन टाईम नाही तर पालकांकडून नकळत होणाऱ्या 'या' चुकांचा मुलांवर वाईट परिणाम
14
खळबळजनक! लेकीने आई आणि बॉयफ्रेंडच्या मदतीने केली वडिलांची हत्या, नंतर पाहिला चित्रपट
15
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
16
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
17
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
18
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."
19
अ‍ॅडवॉन्स सेफ्टी फीचर्स आणि लेटेस्ट टेक्नोलॉजी; प्रीमियम कारच्या खरेदीवर ३ लाखांची सूट!
20
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची न्यूझीलंड सफर! '#BeyondTheFilter' अनुभवासाठी भारतीयांनाही आमंत्रण

बीएसयूपीच्या घरांचा दुरुपयोग

By admin | Updated: March 3, 2017 03:22 IST

रेंटल हाउसिंगची घरे दुसऱ्यांनाच राहण्यासाठी देण्याचे प्रकरण महापालिकेत गाजले असताना आता बीएसयूपीच्या घरांचा घोळही पुढे आला आहे.

ठाणे : रेंटल हाउसिंगची घरे दुसऱ्यांनाच राहण्यासाठी देण्याचे प्रकरण महापालिकेत गाजले असताना आता बीएसयूपीच्या घरांचा घोळही पुढे आला आहे. बीएसयूपीमध्ये मिळालेली घरे परस्पर भाड्याने देणाऱ्या अथवा विविध कागदपत्रांची बनावटगिरी करून ती विकणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार, तब्बल ५५ जणांच्या विरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे पालिकेने निश्चित केले आहे. दीड वर्षापूर्वी रेंटलची घरे मिळाल्यावर ती इतरांना भाड्याने देण्याचे प्रकरणसमोर आल्यानंतर पालिकेने याविरोधात गुन्हे दाखल करताना अशी घरे ताब्यात घेतली होती. आता पुन्हा बीएसयूपीच्या घरांचेदेखील प्रकरण अशा पद्धतीनेसमोर आल्याने पालिकेने आता याविरोधात पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नव्याने रस्ता रु ंदीकरणाची मोहीम हाती घेतल्यानंतर अनेक रहिवाशांचे तत्काळ रेंटल अथवा बीएसयूपीच्या घरांमध्ये पुनर्वसन करण्यात आले. शास्त्रीनगर येथील विस्थापित झालेली ३५८ घरे बाधित झाल्याने त्यांना तुळशीधाम येथील बीएसयूपीच्या घरांमध्ये स्थान देण्यात आले. राहते घरे तोडण्यात आल्याने पर्यायी व्यवस्था करण्यासाठी महापालिकेने ही तातडीची कारवाई केली होती. परंतु,या तातडीच्या उपाययोजनेच्या आर्थिक लाभासाठी फायदा करून घेत काही विस्थापितांनी आपल्या घरांचे रूपांतर दुकानात केले आहे. तब्बल ५५ जणांनी आपली बीएसयूपीची घरे भाड्याने दिली आहेत. तर, पर्यायी घरे मिळाल्यानंतरही ७० जण या घरांमध्ये राहण्यासाठीच गेलेले नाहीत. शहरातील अनेक विस्थापितांना अद्याप घरे मिळालेली नाहीत. अशावेळी मिळालेल्या घरांचाही दुरुपयोग होत असल्याने अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण आक्र मक झाले आहेत. त्यांनी आपली घरे परस्पर भाड्याने देणाऱ्यांच्या विरोधात थेट गुन्हे दाखल करण्याची शिफारस आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे केली आहे. एवढेच नव्हे तर ज्यांची घरे ताबा दिल्यानंतरही महिनोन्महिने बंद आहेत, अशा घरांचा पंचनामा करून ती पुन्हा ताब्यात घेण्याचा उपाय सुचवला आहे. व्हिडीओ चित्रीकरण करून ही बंद असलेली घरे ताब्यात घेण्याची सूचना त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी) >विस्थापितांच्या नावाखाली इतरांनी लाटली घरेमहापालिकेच्या विशेष पथकाने बीएसयूपीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची तपासणी केली होती. या तपासणीमध्ये विस्थापितांच्या नावाखाली इतर नागरिकांनीच घरे लाटल्याचे समोर आले होते. अशाप्रकारे महापालिकेची फसवणूक झाल्याने या रहिवाशांच्या विरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची फाइल अतिरिक्त आयुक्तांच्या दालनातून आयुक्तांच्या दालनात पोहोचली असून आयुक्तांचे शिक्कामोर्तब झाल्यानंतर गुन्हे दाखल होण्याची प्रक्रि या सुरू होणार आहे. दीड वर्षापूर्वी रेंटलची घरे मिळाल्यावर ती इतरांना भाड्याने देण्याचे प्रकरणसमोर आल्यानंतर पालिकेने याविरोधात गुन्हे दाखल करताना अशी घरे ताब्यात घेतली होती.