शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

अबब, मनोरुग्णाच्या पोटातून काढली तब्बल ७२ नाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 7:26 PM

नाशिक :- ‘बेझॉर’ वा ‘पायका’ या नावाने ओळखल्या जाणा-या मानसिक आजाराने ग्रस्त रुग्णाच्या पोटातून डॉक्टरांनी शुक्रवारी (दि़०१) एण्डोस्कोपीद्वारे एक, दोन नव्हे तर तब्बल ७२ चलनी नाणी बाहेर काढली़ कॅनडा कॉर्नरवरील एका खासगी हॉस्पिटलमध्ये ही एण्डोस्कोपी करण्यात आली़ या आजाराने ग्रस्त रुग्णास खडू, केस वा माती यासारख्या वस्तू खाण्याचा मोह होतो; ...

ठळक मुद्देरुग्णाच्या पोटात पैसे : पालघर जिल्ह्यातील रुग्णएण्डोस्कोपीद्वारे काढले गिळलेली नाणी : नाण्यांचे मूल्य १६३ रुपये

नाशिक :- ‘बेझॉर’ वा ‘पायका’ या नावाने ओळखल्या जाणा-या मानसिक आजाराने ग्रस्त रुग्णाच्या पोटातून डॉक्टरांनी शुक्रवारी (दि़०१) एण्डोस्कोपीद्वारे एक, दोन नव्हे तर तब्बल ७२ चलनी नाणी बाहेर काढली़ कॅनडा कॉर्नरवरील एका खासगी हॉस्पिटलमध्ये ही एण्डोस्कोपी करण्यात आली़ या आजाराने ग्रस्त रुग्णास खडू, केस वा माती यासारख्या वस्तू खाण्याचा मोह होतो; मात्र, या रुग्णास चक्क लोखंड अर्थात चलनातील नाणी गिळण्याचीच सवय जडली होती़ डॉ़अमित केले यांनी सुमारे साडेतीन तास शस्त्रक्रिया करून या रुग्णाच्या पोटातून एक, दोन, पाच व दहा रुपयांची ही ७२ नाणी बाहेर काढून जीवदान दिले़पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील थोरातपाडा या छोट्याशा आदिवासी पाड्यावर बेझॉर वा पायका मानसिक आजार झालेला पन्नास वर्षीय कृष्णा सोमल्या सांबर हा पत्नी ताई व आपल्या पाच मुलांसह राहतो़ मद्याची सवय असलेला त्यातच मानसिक आजार असलेल्या कृष्णा गत वीस वर्षांपासून लोखंडी वस्तू त्यातही पैसे गिळण्याचा सवय जडली होती़ तरुणपणी गिळलेली काही नाणी गुद्द्वारामार्फत बाहेर पडली तर काही पोटातील जठराच्या आतील भागात अडकून पडली़ गत तीन वर्षांपासून सतत उलटया व खाल्लेले अन्न पचत नसल्याने त्याने कल्याण तसेच काही खासगी हॉस्पिटलमध्ये तपासणी केली, मात्र निदान झाले नाही़पाणी व ज्युस यावर गत तीन वर्षांपासून जगत असलेल्या कृष्णाची प्रकृती अत्यंत खराब झाल्याने त्याच्या कुटुंबियांच्या ओळखीतून त्यास कॅनडा कॉर्नरवरील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले़ तेथील सर्जन व एण्डोस्कोपीतज्ज्ञ डॉ़ अमित केले यांनी प्रथम कृष्णाच्या पोटाचा एक्सरे काढला त्यामध्ये जठराच्या आतील भागात केवळ एक धातुचा तुकडा असल्याचे दिसत होते़ त्यामुळे डॉक्टर केले यांनी एण्डोस्कोपीचा निर्णय घेतला मात्र जठरामध्ये अन्न असल्याने प्रथम ते साफ करण्यात आले़ यानंतर एण्डोस्कोपीमध्ये कृष्णाच्या जठरामध्ये चलनातील नाणी असल्याचे दिसले़डॉ़अमित केले यांनी रुग्ण कृष्णाच्या पोटावर कोणतीही शस्त्रक्रिया न करता एण्डोस्कोपीद्वारे ही सर्व नाणी बाहेर काढण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार भूलतज्ज्ञ डॉक़ासलीवाल व डॉ़शिल्पा सोनवणे यांनी भूल दिल्यानंतर डॉ़मोरे व डॉ़विजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक़ेले यांनी हॉस्पीटलमधील स्टाफच्या सहकार्याने सुमारे साडेतीन तासांच्या कालावधीत कृष्णाच्या पोटातील जठरातून ७२ नाणी बाहेर काढली़ यानंतर सुमारे दोन तासातच रुग्ण कृष्णा हा शुद्धीवर आला व त्याचा त्रासही कमी झाला आहे़पोटातील नाण्यांचे मूल्य १६३ रुपये

मानसिक आजार झालेल्या कृष्णा सांबर यांनी गिळलेल्या नाण्यांचे मूल्य १६३ रुपये आहे़ गिळलेल्या नाण्यांमध्ये दहा रुपयांची (दोन), ५ रुपयांची (१७), दोन रुपयांची (२१), एक रुपयाची (१४) तर ५० पैशांची चार नाण्यांचा समावेश आहे़ याबरोबरच पाच लोखंडी वायसर व एक नटही पोटातील जठरातून बाहेर काढण्यात आला आहे़दोन लाख रुग्णांमधून एकास आजार

मानसिकदृष्टया बेझॉर किंवा पायका आजार असलेला रुग्णास खाण्याचा आजार जडतो़ त्यातही कृष्णा सांबर यास जडलेला लोखंडी वस्तू गिळण्याचा आजार हा २०० एण्डोस्कोपी मध्ये एकास अर्थात दोन लाख रुग्णांमधून एकास असू शकतो़ जठरामध्ये अडकलेल्या नाण्यांमुळे गत तीन वर्षांपासून कृष्णाला उलटी व पोट फुगण्याचा त्रास होता़ जेवनानंतर पोटातील अन्न उलटीद्वारे बाहेर पडायचे़ पाणी व द्रवपदार्थावर जगणाºया कृष्णाला या उपचारांमुळे जीवदान मिळाले आहे़- डॉ़अमित केले, कृष्णा हॉस्पिटल व क्रिटीकल केअर सेंटर, नाशिक़ (फोटो :- आर / फोटो / ०१ डॉ़अमित केले या नावाने सेव्ह केला आहे़)अन्न पचत नव्हते

मी काय खात होतो, तेच कळत नव्हते़ नाणी पोटात असल्याने अन्न पचत नव्हते व प्रकृतीही ढासळत चालली होती़ कल्याणसह इतर दवाखान्यांमध्ये तपासणी केली मात्र त्या डॉक्टरांना निदानच झाले नाही़ आता आपरेशननंतर चांगले वाटत असून यापुढे नाणी गिळणार नाही़- कृष्णा सांबर, रुग्ण मद्यप्राशनाची सवय

पतीला मद्यप्राशनाची सवय होती त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत होते़ तिन्ही मुले वेगळी राहत असल्याने लक्ष देण्यासाठी कोणीही नव्हते़ ओळखीतून या रुग्णालयात आलो व पतीचा आजार दूर झाला़- ताई सांबर, रुग्णाची पत्नी