अबू आझमींच्या भाच्याला 10 दिवसांची पोलिस कोठडी
By Admin | Updated: June 8, 2017 20:19 IST2017-06-08T20:19:46+5:302017-06-08T20:19:46+5:30
समाजवादी पार्टीचे नेते अबू अजमी यांच्या भाच्याला दिल्ली कोर्टाने १० दिवासांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

अबू आझमींच्या भाच्याला 10 दिवसांची पोलिस कोठडी
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि, ८ - समाजवादी पार्टीचे नेते अबू अजमी यांच्या भाच्याला दिल्ली कोर्टाने १० दिवासांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीमध्ये त्याचा सहभाग असल्याचा दिल्ली पोलिसांचा दावा आहे. दिल्ली पोलिसांच्या ह्यस्पेशल सेलह्णने मंगळवारी अबू असलम कासिम नामक तरुणाला वाकोल्यातील पंचतारांकित हॉटेलमधील एका रूममधून अटक केली होती.
वाकोल्याच्या ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये कासिम लपल्याची माहिती दिल्लीच्या स्पेशल सेलचे पोलीस उपायुक्त संजीव यादव यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने या हॉटेलमधून कासिमला अटक केली. या ठिकाणी तो त्याच्या मैत्रिणीसोबत आला होता. रात्री साडेदहाच्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे वाकोला पोलिसांकडून सांगण्यात आले.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये एका ठिकाणी धाड टाकत अमलीपदार्थांचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला. ज्याची किंमत सुमारे चाळीस कोटी रुपये आहे. या प्रकरणी तिघांना दिल्ली पोलिसांनी अटक करत त्यांची चौकशी सुरू केली. हे अमलीपदार्थ कासिमनेच त्यांना पुरविले असून, अमलीपदार्थांचा तो देशातील मोठा तस्कर असल्याचेही ते म्हणाले. तेव्हापासून दिल्ली पोलिसांची कासिमवर नजर होती. समुद्रमार्गे अमलीपदार्थांची तस्करी तो करत होता. दुबईमध्ये असलेल्या कैलाश राजपूत नामक इसमाचेही नाव या प्रकरणी पुढे आले आहे. राजपूत दुबईतून अमलीपदार्थ कासिमला पुरवत होता. कासिमनंतर मुंबई, दिल्ली तसेच अनेक मोठ्या शहरांमध्ये त्याचा पुरवठा करत असल्याचेही तपासात उघड झाले आहे.